दगडहल्ला म्हणजे झेड किंवा वाय प्लस सुरक्षेसाठी पडळकरांनी रचलेले सुनियोजित कटकारस्थान - Stone attack is a well-planned complot hatched by Padalkars for Z or Y Plus security : Amol Mitkari | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

दगडहल्ला म्हणजे झेड किंवा वाय प्लस सुरक्षेसाठी पडळकरांनी रचलेले सुनियोजित कटकारस्थान

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 जुलै 2021

तो भारतीय जनता पक्षाने ठरवून केलेला स्टंट आहे.

नागपूर : विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी (ता. ३० जून) सोलापुरात जो हल्ला झाला आहे, तो भारतीय जनता पक्षाने ठरवून केलेला स्टंट आहे. पत्रकारांशी बोलताना आज (ता. १ जुलै) आमदार पडळकर म्हणाले की हा हल्ला उपेक्षित, दलित, शोषित आणि वंचित वर्गाचा आवाज दाबण्यासाठी हल्ला केला आहे. हा उपेक्षित वर्ग ४० ते ५० लाख रुपयांच्या गाड्या घेऊन फिरत नसतो. ही प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाकडूनच आलेली आहे. तो एक पब्लिसिटी स्टंट आहे. हा जो दगडहल्ला झाला, त्यामुळे आपल्याला झेड किंवा वाय प्लस सुरक्षा भेटेल. यासाठी गोपीचंद पडळकर यांनी केलेले हे सुनियोजित कटकारस्थान आहे. राज्यातील जनतेला हा सर्व प्रकार माहीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांच्यावर हल्याप्रकरणी केला आहे. (Stone attack is a well-planned complot hatched by Padalkars for Z or Y Plus security : Amol Mitkari)

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सायंकाळी सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात दगडहल्ला झाला होता. त्यावरून राजकीय क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. तत्पूर्वी बुधवारी सकाळी पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. 

हेही वाचा : पडळकरांना जाब विचारता; मग गायकवाडांना मोकळे का सोडता!

हेही वाचा : पडळकर मनोरुग्ण असून, ही पीडा भाजपला मातीत घालणार; शिवसेनेचीही वादात उडी

हेही वाचा : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

त्यासंदर्भात बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांचा अत्यंत खरपूस शब्दांत समाचार घेतला होता. आमदार मिटकरी म्हणाले की, आज जागतिक कृषी दिन आहे. त्यानिमित्ताने गोपीचंद पडळकर यांना माझे सांगणे आहे की, शेतकऱ्यांसाठी बांधावर जाण्याचा जरा प्रामाणिक प्रयत्न करा. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रासाठी जे देणं दिलं आहे, त्याचा प्रचार करा. माणमाणसांमध्ये भांडणे लावून तुमची आरएसएसची मानसिक विकृती जगासमोर आणू नका. अन्यथा भारतीय जनता पक्षाला तोंड काळं करावे लागेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षानेसुद्धा अशा लोकांपासून सावध असावे, असा सल्लाही आमदार मिटकरी यांना भाजपला दिला आहे.

नेमकं काय झालं होतं

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात बुधवारी (ता. ३० जून) सायंकाळी दगडफेक झाली. यात घटनेत कोणालाही इजा झालेली नाही, असे पडळकर यांनी या घटनेनंतर मीडियाशी बोलताना सांगितले होते. पडळकर यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. 

दगडफेकीसंदर्भात पडळकर म्हणाले की, मी सोलापूर जिल्ह्यात घोंगडी बैठका घेत आहे. बुधवारी सकाळपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात आम्ही घोंगडी बैठका घेत आहोत. दुपारी पत्रकार परिषद झाल्यानंतर आमची मड्डी वस्तीत बैठक होती. ती बैठक काही कारणामुळे सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसून थोडे पुढे आल्यानंतर गाडीवर मोठे दगड टाकण्यात आले. त्यानंतर ते सर्वजण पळून गेले आहेत.

पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात कशा प्रकारे गुंडगिरी चालते, हे राज्याला माहिती आहे. यामध्ये कोणालातरी पुढे केले असेल. आम्ही लोकशाही मानतो, आम्ही सुसंस्कृत आहोत, अशा वावड्या उठवणाऱ्यांचा चेहरा या प्रकारामुळे पुढे आलेला आहे. माझ्या गाडीवर दगडफेक करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न असेल तर माझा आवाज असा बंद होणार नाही. उद्या गोळ्या जरी घातल्या तरी मी या विषयात मागे हटणार नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख