उपराजधानीत परिस्थिती हाताबाहेर, माजी मंत्री, जिल्हाधिकारी बाधित, महापौर विलगीकरणात

उपचार घेत असलेल्या सर्वाधिक बाधितांचे मृत्यू मेडिकलमध्ये झाले. मेडिकलमध्ये ६९४ जणांची उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला. मेयोमध्ये ५२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये १६४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
nagpur zero mile-corona
nagpur zero mile-corona

नागपूर : कोरोनाचा उद्रेक गंभीर होत चालला असून जिल्ह्यात परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, त्यांच्या पत्नी आभा चतुर्वेदी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वाहनचालक पॉझिटिव्ह आढळल्याने महापौर संदीप जोशी यांनाही डॉक्टरांनी पाच दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला. काल दिवसभरात २२०५ जण बाधित आढळले. बाधितांच्या संख्येने एका दिवसातील विक्रम केला असला तरी गेल्या तीन दिवसांपासून पन्नासावर असलेली कोरोनाबळींची संख्या ३४ वर आली. एकूण बळींची संख्या १४०० च्या घरात पोहोचल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसतेय. 

शहरात कोरोनाने घट्ट पाय रोवल्याने नागरिकांतही भीतीचे वातावरण आहे. शहरातील विविध लॅबमधून आलेल्या अहवालाने चिंतेत आणखी भर घातली. एका दिवसातील सर्वाधिक २२०५ बाधित आज आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेतही खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा शहराला जणू विळखाच पडल्याचे दिसून येत आहे. आज आढळून आलेल्या बाधितांमध्ये शहरातील १८५३ जणांचा समावेश आहे. ग्रामीणमधील ३४९ जणांना कोरोनाची लागण झाल्याने गावांमध्येही कोरोना झपाट्याने पसरत असल्याचे स्पष्ट झाले. शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या ३४ जणांचा आज मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत पन्नासावर नागरिक कोरोनाबळी ठरत होते. आज बळींचा आलेख खाली असला तरी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे अधोरेखित झाले. 

आज आढळून आलेल्या बाधितांसह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४३ हजार २३७ वर पोहोचली तर बळींची संख्या १३९९ पर्यंत पोहोचली. यात शहरातील ३४ हजार ३५२ तर ग्रामीणमधील ८५७७ जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे. ३०८ जण जिल्ह्याबाहेरील आहेत. आतापर्यंत शहरातील १०७७ जण कोरोनाचे बळी ठरले. ग्रामीणमधील १९६ जणांचा तर जिल्ह्याबाहेरील १२६ जणांचा बळीमध्ये समावेश आहे. दरम्यान, आज जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेही पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी ठाकरे विलगीकरणात गेले. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व त्यांच्या पत्नी आभाही पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. महापौरांचे वाहनचालक मनोज मिश्राही पॉझिटिव्ह आढळून आले. महापौर जोशी यांनी सोशल मीडियातून याबाबत माहिती दिली व त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही चाचणी करण्याची सूचना केली. पाच दिवसानंतर महापौर कोरोना चाचणी करणार आहेत. 

३० हजार रुग्णांची कोरोनावर मात 
कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांवर गेली असतानाच आज १८०३ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३० हजार ४६१ पर्यंत पोहोचली आहे. यात शहरातील २४ हजार ४३१ तर ६०३० ग्रामीणमधील नागरिकांचा समावेश आहे. 

११ हजार रुग्णांवर उपचार सुरू 
शहरातील मेयो, मेडिकलसह विविध हॉस्पिटल, कोव्हीड केअर सेंटरमध्ये ५ हजार ३२७ बाधितांवर उपचार सुरू आहेत तर ६०५० जण घरीच उपचार घेत आहेत. एकूण ११ हजार ३७७ जणांवर उपचार सुरू आहेत. यात ८ हजार ३६६ जण शहरातील असून ३०११ ग्रामीण भागातील आहेत. 

सर्वाधिक मृत्यू मेडिकलमध्ये 
उपचार घेत असलेल्या सर्वाधिक बाधितांचे मृत्यू मेडिकलमध्ये झाले. मेडिकलमध्ये ६९४ जणांची उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला. मेयोमध्ये ५२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये १६४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.            (Edite By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com