भंडारा घटनेची गंभीर दखल ; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश 

राहुल गांधी, नितीन गडकरी यांनी घटनेची दखल घेत दुःख व्यक्त केले.
bhandra medical hosptyal
bhandra medical hosptyal

नागपूर : भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. माहिती घेण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. 

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील चर्चा केली असून, त्यांनाही तपासाचे निर्देश दिले आहेत. 

राहुल गांधींनी व्यक्त केली हळहळ

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भंडारातील या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली. त्याचबरोबर राज्य सरकारने जखमी व मृतांच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करण्याचं आवाहनही केलं आहे. “महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना वेदनादायी आहे. जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबांबद्दल माझ्या सहवेदना व्यक्त करतो. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने सर्वोतोपरी मदत करावी, असं आवाहन मी करतो,” असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे. 

अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना : नितीन गडकरी 

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे. ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना, असे टि्वट करत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. 

 मध्यरात्री काय घडले?

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घटली. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आग लागली. या आगीत सतरा बालकांपैकी सात बालकांना वाचविण्यात यश आलेले आहे.

शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्ण युनिट मधून धूर निघत असल्याचे दिसले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निषमक दलाने घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. 

या SNCU मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत यांपैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. अतिषय दुर्दैवी आणि दुःखद घटनेमुळे राज्यभरातील समाजमन हळहळले. फायर ऑडीट झाले की नाही, याबाबत रुग्णालय अधिकाऱ्यांकडून काहीही माहिती दिली जात नाहीये. घटनास्थळी कुणालाही जाऊ दिले जात नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com