तुकाराम मुंढेंचा दणका; खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांचे पैसे केले परत

९९१ रुग्णांपैकी केवळ ३०४ रुग्णांकडून वसूल केलेल्या शुल्काची माहिती सेव्हन स्टारने पालिकेला दिली. परंतु ६८७ रुग्णांकडून वसूल केलेल्या शुल्काची माहिती दडविल्याचेही पुढे आले. याबाबतही आयुक्तांनी रुग्णालयाला स्पष्टीकरण मागितले होते. परंतु सेव्हन स्टार रुग्णालयाने समाधानकारक उत्तर न दिल्याने आयुक्तांनी दंड ठोठावला. वोक्हार्ट हॉस्पिटलला रुग्णांकडून उकळलेले अवाजवी साडेनऊ लाख रुपये परत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : शासनाने ठरवून दिलेल्या दरांनुसार खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून पैसे घेणे अपेक्षित आहे. अजूनही असे होत नाही. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट केली जाते. पण महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका दिल्यानंतर शहरातील सेव्हन स्टार आणि वोक्हार्ट या दोन रुग्णालयांनी कोरोनाबाधितांना १० लाख ५० हजार रुपये परत केले आहेत. मुंढे यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन तसे ट्विट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुंढेंनी १४ आॅगस्टलाच खासगी रुग्णालयांना इशारा दिला होता.  

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणारे, सम आणि विषम तारखांचे नियम मोडणारे दुकानदार यांच्याकडून तब्बल ६१ लाख ९० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलने एक लाख रुपये, तर वोक्हार्ट रुग्णालयाने नऊ लाख ५० हजार रुपये रुग्णांना परत केले आहेत. राज्य सरकारने कोविडसह विविध आजारांच्या रुग्णांसाठी ठरवून दिलेल्या शुल्काशिवाय जास्त शुल्क आकारणे आणि कोविड रुग्णांसाठी ८० बेडचे आरक्षण धुडकावून लावल्याप्रकरणी सेव्हन स्टारवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

राज्य सरकारने खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णांसाठी आकारण्यात येणारे शुल्क ठरवून दिले आहे. परंतु सरकारच्या आदेशाला पायदळी तुडवीत जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलने रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याचे पालिकेच्या तपासणीत उघडकीस आले. जास्त आकारलेले शुल्क रुग्णांना परत करा, असे आदेश मुंढे यांनी ‘सेव्हन स्टार'ला पूर्वीच दिले होते. सेव्हन स्टार रुग्णालयात तपासणी केल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे जप्त केली होती. यात ९९१ रुग्णांची कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. 

९९१ रुग्णांपैकी केवळ ३०४ रुग्णांकडून वसूल केलेल्या शुल्काची माहिती सेव्हन स्टारने पालिकेला दिली. परंतु ६८७ रुग्णांकडून वसूल केलेल्या शुल्काची माहिती दडविल्याचेही पुढे आले. याबाबतही आयुक्तांनी रुग्णालयाला स्पष्टीकरण मागितले होते. परंतु सेव्हन स्टार रुग्णालयाने समाधानकारक उत्तर न दिल्याने आयुक्तांनी दंड ठोठावला. वोक्हार्ट हॉस्पिटलला रुग्णांकडून उकळलेले अवाजवी साडेनऊ लाख रुपये परत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार  वोक्हार्टने रुग्णांना उकळलेले अवाजवी शुल्क परत केले आहे. 

दीड लाखांपर्यंत अतिरिक्त उकळले 
सेव्हन स्टार हॉस्पिटलने पालिकेकडे दिलेल्या रेकॉर्डनुसार विविध आजाराच्या रुग्णांकडून दीड लाखांपर्यंतची रक्कम अधिक उकळल्याचे पुढे आले. जयंत मेश्राम या रुग्णाकडून हॉस्पिटलने २ लाख २१ हजार ३९० रुपये घेतले. मुळात राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार त्यांच्याकडून ६९ हजार ४१९ रुपये घेणे अपेक्षित होते. त्यांना १ लाख ५१ हजार ९७१ रुपये परत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. याशिवाय आणखी ३७ रुग्णांकडून अवाजवी शुल्क उकळण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com