वनमंत्र्यांना शोधा बक्षीस मिळवा....यवतमाळमध्ये व्हायरल पोस्टची चर्चा! - Post Viral about Maharashtra Forest Minister Sanjay Rathod | Politics Marathi News - Sarkarnama

वनमंत्र्यांना शोधा बक्षीस मिळवा....यवतमाळमध्ये व्हायरल पोस्टची चर्चा!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील वानवडी परिसरात पूजा चव्हाण नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. सोशल मीडियावर 'टिक-टॉक स्टार' अशी पूजाची ओळख होती. अशातच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनेक नवनवी माहिती समोर येऊ लागली आहे

यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. दुसरीकडे त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यात 'वनमंत्र्यांना शोधा...बक्षीस मिळवा....मंत्री फरार झाला थरार' अशी पोस्ट व्हायरल झाली आहे. यावरुन जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील वानवडी परिसरात पूजा चव्हाण नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. सोशल मीडियावर 'टिक-टॉक स्टार' अशी पूजाची ओळख होती. अशातच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनेक नवनवी माहिती समोर येऊ लागली आहे. अशातच आता भाजपकडून थेट संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.

पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या तरुणीने रविवारी (७ फेब्रुवारी) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मूळची बीड जिल्ह्यातील असलेली पूजा दोन मुलांसोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर तिने इमारतीवरून उडी मारली होती.पूजा चव्हाण ही तरुणी काही दिवसांपूर्वीच पुण्यात इंग्लिश स्पिकिंग क्लाससाठी आली होती. तिच्या आत्महत्येनंतर तिचे आणि तिच्या मित्राचे राज्य सरकारच्या एका मंत्र्यांसोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान,  टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली असून एखाद्याच्या आयुष्याशी खेळायला नको. चौकशीतून सत्य काय ते बाहेर येईल, असे सांगितले आहे. ``याबद्दल सखोल चौकशी केली जाईल. एखाद्याला आयुष्यातून उठवायचे प्रयत्नदेखील व्हायला नको. गेले काही दिवस काही महिने आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेही दिसून आले. असेही व्हायला नको. त्याची सखोल तपासणी केली जाईल आणि जनतेला सत्य काय ते कळेल,`` अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली आहे.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख