महाराष्ट्रात लाच घेण्यात पोलिसच नंबर वन...

लाचेच्या नोटांना फिनॉप्थेलिन किंवा अँथ्रासिन रसायनाची पावडर लागलेली असते. लाच स्वीकारल्यानंतर आरोपीचे हात सोडियम काबरेनेटच्या द्रावणात टाकल्यानंतर हात लालसर किंवा गुलाबी होतात. यालाच रंगेहात अटक, असे म्हटले जाते. ही कारवाई पंचांसमक्ष होते. हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा असतो.
Police Bribe
Police Bribe

नागपूर : अभिनेत्री कंगना राणावत ने मुंबई पोलिसांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस किती कर्तबगार आहेत, याबद्दल आतापर्यंत बरेच पुढारी बोलले. मुंबई पोलिसांची तुलना अगदी स्कॉटलॅंड यार्ड पोलिसांसोबत देखील केली गेली. परंतु सत्य हेच आहे की, महाराष्ट्रात लाच घेण्यात पोलिस विभाग आजही अव्वल आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. नाही म्हणायला काही प्रामाणिक लोकंही प्रत्येक विभागात आहेत. पण लाचखोरांचाच भरणा अधिक असल्याचे वास्तव आहे.  

राज्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून गेल्या नऊ महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४१२ यशस्वी सापळे रचून ५६४ लाचखोरांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये पोलिस विभाग पहिल्या स्थानावर कायम आहे. प्रत्येक शासकिय विभागात लाच दिल्याशिवाय काम होत नाही, ही सत्यस्थिती आहे. लाच घेण्याच्या प्रकरणात पोलिस विभागाचा प्रथम क्रमांक लागतो. काही प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांपासून ते शिपायांपर्यंत लाचेशिवाय काम होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात गेल्या जानेवारी ते सप्टेंबर पर्यंत ४४२ कारवाया करण्यात आल्या. त्यात पोलिस विभागावर सर्वाधिक ९५ सापळा कारवाई करीत १३८ पोलिस कर्मचाऱ्यांना अटक केली. तर महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभागातील १०४ लाच प्रकरणांत १४० जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच पंचायत समितीच्या ३४ सापळ्यांत ४९ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. पोलीस खात्यात सर्वाधिक लाच स्विकारण्याचे प्रकरणे झपाट्याने समोर येत आहेत. 

पोलिसांचा ससेमिरा आणि स्वतःची बदनामी टाळण्यासाठी अनेक जण लाच या शस्त्राचा वापर करतात. तसेच काही पोलीस कर्मचारी लाच मिळविण्यासाठीच अनेकांना धमक्‍या देतात. शासकीय सेवेच्या अन्य खात्यांतील अधिकाऱ्यांना लाच घेताना अडकवता येते. मात्र पोलीस विभागातीलच अधिकाऱ्यांनी किंवा पोलीस शिपायांनी लाच मागितल्यास अनेक जणांना दाद मागण्यासाठी कोठे जावे, असा प्रश्‍न पडतो. कारण पोलिसांवरही कारवाई करणारे पोलीसच असल्यामुळे अनेक तक्रारकर्ते समोर येत नाहीत. नागपूर पोलिस दलातील १४ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एसीबीने गेल्या दोन वर्षात लाच घेताना अटक केली आहे.

रंगेहाथ म्हणजे काय?
लाचेच्या नोटांना फिनॉप्थेलिन किंवा अँथ्रासिन रसायनाची पावडर लागलेली असते. लाच स्वीकारल्यानंतर आरोपीचे हात सोडियम काबरेनेटच्या द्रावणात टाकल्यानंतर हात लालसर किंवा गुलाबी होतात. यालाच रंगेहात अटक, असे म्हटले जाते. ही कारवाई पंचांसमक्ष होते. हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा असतो. तरीही आरोपींचे निर्दोष होण्याचे प्रमाण अधिक आहे. वस्तुत: एक शिक्षा ही भविष्यातील अनेक प्रकरणांना आळा घालणारी ठरू शकते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशीच धडक्‍याने कारवाई करीत राहिल. तक्रारकर्त्यांनी निर्भिड होऊन पुढे यावे, तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाईल. लाच स्विकारण्याची कुप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. कोणत्याही विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याने लाच मागितली तर बिनधास्त एसीबीत तक्रार करा. तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जाईल.
- रजनिश सेठ, पोलिस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.       (Edited By : Atul Mehere)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com