police complaint against arnab goswami | Sarkarnama

अर्णब गोस्वामी विरोधात पोलीसांत तक्रार

राजेश चरपे
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत एकरी भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात व्हीडीओ कळमना पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना सादर केला आहे. या तक्रारीत अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक भारत वाहिनीवर गुन्हा दारवल करण्याची मागणी करण्यात आली.

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार पाडण्याची धमकी देणाऱ्या रिपब्लिक भारत वाहिनीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात मंगळवारी कळमना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बाबतीत एकेर भाषेचा वापर केल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखाल्याचेही तक्रारकर्ते रविनीश पांडे यांनी म्हटले आहे.

‘उध्दव साहेब फॅन्स़'चे संयोजक रविनीश पांडे ऊर्फ चिंटू महाराज यांनी ही तक्रार दाखल केली. वाहिनीच्या एका कार्यक्रमात अर्णबने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकार पाडण्याची धमकी दिली, तसेच मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत एकरी भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात व्हीडीओ कळमना पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना सादर केला आहे. या तक्रारीत अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक भारत वाहिनीवर गुन्हा दारवल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी चिंटू महाराज यांच्या सोबत अरविंद राजपूत, समित कपाटे, विजय शाहू यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी होते.    (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख