राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण 

आज दुपारीच बच्चू कडू यांच्या हस्ते वीज विभागाच्या कंत्राटी कामगारांना धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे.
Minister of State Bachchu Kadu infected with corona
Minister of State Bachchu Kadu infected with corona

मुंबई : राज्याचे कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ट्विटरवर पोस्ट करून त्यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घेण्याचे आवाहनही मंत्री कडू यांनी केले आहे. 

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज (ता. 19 सप्टेंबर) दुपारी कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे आज दुपारीच बच्चू कडू यांच्या हस्ते वीज विभागाच्या कंत्राटी कामगारांना धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. या वेळी बऱ्याच कामगारांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी कार्यक्रमाच्या ठिकाणी झाली होती. त्यामुळे आता या सर्वांनी स्वतःची तपासणी करण्याचे आवाहन राज्यमंत्री कडू यांनी केले आहे. 

दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोल्हापूरचे नेते हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत या ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांना शुक्रवारी (ता. 18 सप्टेंबर) एकाच दिवशी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या दोघांनीही ट्‌विट करत ही माहिती दिली होती. 

मुश्रीफ यांनीही ट्‌विटद्वारे माहिती देत म्हटले होते की माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून कोरोनावर मात करून लवकरच आपल्या सेवेत दाखल होईन. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. 

उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सांगितले की लक्षणे नसल्याने त्यांना तूर्तास घरातच विलिगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

महाराष्ट्रीत अनेक आमदार व काही मंत्री आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गडकरी हे सोमवारी (ता. 14 सप्टेंबर) संसद अधिवेशनाला काही काळ उपस्थित होते आणि पहिल्याच रांगेत बसले होते. यामुळे आरोग्य यंत्रणांची धावपळ झाली. 

राज्याच्या मंत्रिमंडळातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. हे सर्व मंत्री सध्या राज्यात काम करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com