चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' वक्तव्याबाबत सभागृहात तोडगा काढू : नाना पटोले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात नव्या ट्रान्सफर मंत्रालयाची स्थापना झाली असल्याची खोचक टीका ट्विटरवरुन सरकारवर केली होती.
Nana Patole
Nana Patole

गोंदिया : राज्यातील सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष सभागृहाच्या बाहेर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टिका करीत असतात. पण सभागृहाच्या बाहेर मी त्यावर काही बोलू शकत नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर जी टिका केली होती. हा विषय जेव्हा सभागृहात येईल, तेव्हा त्यावर तोडगा काढला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात नव्या ट्रान्सफर मंत्रालयाची स्थापना झाली असल्याची खोचक टीका ट्विटरवरुन सरकारवर केली होती. एका कार्यक्रमासाठी नाना पटोले येथे आले होते. पटोले यांना विचारले असता त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ‘सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे, मला खात्री आहे की, महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल. मला आशा आहे कि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी सीबीआआयमार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.’ असे ट्विट केले होते. याबाबत पटोले यांना विचारले असता, त्यांनी सध्या या प्रकरणी राज्यात विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाली असून विधानसभा अध्यक्ष या नात्याने मी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकणार नाही, असे माध्यम प्रतिनिधींना सांगितले.       (Edited By : Atul Mehere)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com