लोकांचे जीव जात असताना संमेलनाची चर्चा काय करताय? 

राज्यात कोरोनाचे संकट मोठे आहे. शेकडो लोक कोरोनाशी झुंजत आहेत. अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला आहे. अशावेळी आगामी मराठी साहित्य संमेलनाचा विचार आणि त्यावर चर्चा कशी होऊ शकते.
Kautikrao Thale-Patil's criticism on the discussion of organizing Sahitya Sammelan
Kautikrao Thale-Patil's criticism on the discussion of organizing Sahitya Sammelan

पुणे : राज्यात कोरोनाचे संकट मोठे आहे. शेकडो लोक कोरोनाशी झुंजत आहेत. अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला आहे. अशावेळी आगामी मराठी साहित्य संमेलनाचा विचार आणि त्यावर चर्चा कशी होऊ शकते, असा सवाल करून संमेलन होणार की नाही आणि झाले तर कुठे होणार, यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही, असे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले. 

दरवर्षी साधारणपणे जानेवारी महिन्यात मराठी साहित्य संमेलन होते. या वर्षी साहित्य संमेलनासाठी नाशिक, अंमळनेर व दिल्ली येथून निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, कोरानाचे संकट गेली दोन महिने राज्यभर घोंगावत असल्याने संमेलन रद्द करण्याचा विचार महामंडळाकडून सुरू आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता नाशिक व अंमळनेर या दोन्ही ठिकाणी संमेलन होणे कितपत शक्‍य आहे, याबाबत शंका आहे. या पार्श्‍वभूमीवर "सरहद' या संस्थेच्या वतीने संमेलन दिल्लीत घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. साहित्य संमेलनात खंड पडू नये, ही सरहदची त्यामागची भूमिका आहे. 

या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष ठाले-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, सरकारनामाशी बोलताना ते म्हणाले, ""आताची परिस्थिती मोठी संकटाची आहे. राज्यावर एवढे मोठे संकट आले असताना या काळात साहित्य संमेलन घ्यायचे का? कुठे घ्यायचे? याबाबत चर्चादेखील करणे योग्य नाही. या संदर्भात निर्णय घ्यायला अद्याप वेळ आहे. मुळात संमेलनाची निमंत्रणे आल्यानंतर स्थळ निश्‍चित करण्याची एक प्रक्रिया असते. अर्थात यातील काहीही करण्याची ही वेळ नाही. त्यामुळे या संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा, तो कोरानोचे संकट मावळल्यानंतर घेण्यात येईल.'' 

साहित्य महामंडळ ही मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. संमेलनाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे आधिकार या महामंडळाला असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्य विश्‍वातील मोठा सांस्कृतिक उत्सव असतो. दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात होत असतो. गेल्या वर्षीचे संमेलन उस्मानाबादला झाले होते. त्याला मराठी रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 

मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात यापूर्वी त्या-त्या वेळच्या तत्कालिक कारणाने काहीवेळा संमेलन होऊ शकलेले नाही. आताचे कोरोनाचे संकट देशव्यापी आहे. गेल्या शंभर वर्षांत असे देशव्यापी संकट आले नव्हते. त्यामुळे या वर्षीचे संमेलन खरोखरच होणार का? आणि झाले तर ते कुठे होणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com