ज्योतिरादित्य सिंधिया नागपुरात, घेतले स्मृती मंदिराचे दर्शन

काँग्रेसमधील वातावरण आता अनुकूल नाही. त्यामुळेच सिंधियांनी पक्ष सोडला होता. आता त्यांनी भाजपच्या इतर नेत्यांप्रमाणेच नागपुरातील स्मृती मंदिर परिसराला भेट दिली आहे. तसेच संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांच्या निवासस्थानीही त्यांनी भेट दिली.
Jyoriraditya Sindhiya
Jyoriraditya Sindhiya

नागपूर : कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांचे एकेकाळचे खास निकटवर्तीय राहिलेले युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर आज प्रथमच नागपुरात आले. तसेही नागपुरात येण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते. या भेटीत त्यांनी स्मृती मंदिरात दर्शन घेतले. सायंकाळी साडेसहा वाजता संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांना ते भेटणार असल्याची माहिती आहे. 

सिंधिया यांनी आज नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील परिसराला भेट दिली. काही महिन्यांपूर्वी सिंधिया यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले होते. काँग्रेसमधील वातावरण आता अनुकूल नाही. त्यामुळेच त्यांनी पक्ष सोडला होता. आता त्यांनी भाजपच्या इतर नेत्यांप्रमाणेच नागपुरातील स्मृती मंदिर परिसराला भेट दिली आहे. तसेच संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांच्या निवासस्थानीही त्यांनी भेट दिली. 

स्मृती मंदिर परिसरात दाखल 
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर गुरुजी या दोघांच्याही समाधिस्थळाचे दर्शन घेतले. 

संध्याकाळी जाणार संघ मुख्यालयात?
ज्योतिरादित्य सिंधिया आपल्या पहिल्याच नागपूर दौऱ्यावर असताना आज संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

प्रेरणादायी स्थळ 
‘डॉ. हेडगेवार यांचे निवासस्थान म्हणजे एक प्रेरणादायी स्थळ आहे. त्यामुळेच मी इथे भेट द्यायला आलो आहे’, अशी भावना यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केली आहे.
 (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com