नागपुरातील आयएएस केंद्राने दिले सहा अधिकारी

यूपीएससीत अनेक विषय एकाचवेळी अभ्यासावे लागतात. यामुळे कोणत्याही विषयाकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. मी स्वतः सकाळी ९ वाजतापासून अभ्यास करायचो, आवश्यक तेव्हाच ब्रेक घेऊन पुन्हा अभ्यासाला लागायचो. परीक्षा जवळ येईल तसतसे अभ्यासाची वेळ वाढविणे आवश्यक आहे.
nikhil dube
nikhil dube

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घोषित करण्यात आलेल्या मुख्य परीक्षेच्या निकालात नागपूरच्या जुने मॉरिस कॉलेज येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रतील सहा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यात चंद्रपूरच्या दोन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. याच केंद्रातील निखिल दुबे यांनी 733 रँक मिळविला. विशेष म्हणजे निखिल यांनी दुसऱ्यांदा यपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात अभ्यास करणारा पुण्याचा प्रसाद शिंदे (२८७), नाशिकचा आशिष कांबळे (६५१), चंद्रपूरची प्रज्ञा खंडारे (७१९), नागपूरचा निखिल दुबे (733), चंद्रपूरचा सुमित रामटेके (७४८), स्वरूप दीक्षित (८२७) यांनी यूपाएससी परीक्षेत बाजी मारली. निखील दुबे यांनी दुसऱ्यांदा यपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये यूपाएससीत यश मिळवीत इंडियन इन्फर्मेशन सर्व्हीसमध्ये सहायक संचालक पदी नियुक्ती मिळविली. २०१८ पासून ते या पदावर दिल्लीत कार्यरत आहे.

अभियांत्रीकी पदवीनंतर एमबीए करणाऱ्या निखीलचे वडील मत्स्य विभागाचे सहायक आयुक्तपदावरून नियुक्त झाले आहेत. त्यांचे मावसभाऊ अभिन व राजेश मोडक यांनी यापूर्वी यूपीएससीत बाजी मारली आहे. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनात निखलनेही २०१४ पासून यूपीएससीचा अभ्यास आणि तयारी सुरू केली. राष्ट्रपिता जोतीबा फुले अभ्यासिकेतून पूर्ण डिव्होशनने अभ्यास सुरू होता. २०१८ मध्ये हे परीश्रम फळाला आले.

निखीलने यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे, की यूपीएससीची परीक्षा देताना कठोर परीश्रमाला पर्याय नाही. दररोज किमान ७ ते ८ तास नियमित अभ्यास आवश्यक आहे. ऑप्शनल विषयांवर भर देणे क्रमप्राप्त आहे. चालू घडामोडींसाठी वृत्तपत्रांचे वाचन आवश्यक आहे. यूपीएससीत अनेक विषय एकाचवेळी अभ्यासावे लागतात. यामुळे कोणत्याही विषयाकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. मी स्वतः सकाळी ९ वाजतापासून अभ्यास करायचो, आवश्यक तेव्हाच ब्रेक घेऊन पुन्हा अभ्यासाला लागायचो. परीक्षा जवळ येईल तसतसे अभ्यासाची वेळ वाढविणे आवश्यक आहे.   (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com