भूमिपूजनाचा सोहळा डोळ्यांत साठवत त्यांनी घेतला अखेरचा निरोप

१९९० पासून ते १९९२ पर्यंत राम मदिराच्या आंदोलनामध्ये लक्ष्मीकांत सक्रिय सहभागी होते. आज सकाळी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन सुरू असताना ते मेहकरमधील श्रीराम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीसमोर बसले होते. जुन्या आठवणींना उजाळा देत असताना लक्ष्मीकांत एकदम हसत खेळत मोठमोठ्याने श्रीरामाच्या नावाचा जयघोष करीत होते. अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि जागीच त्यांनी प्राण सोडले. उपस्थितांनी धावपळ केली, पण काही उपयोग झाला नाही.
Buldana Sanjay Jadhav-moharil
Buldana Sanjay Jadhav-moharil

बुलडाणा : अयोध्येमध्ये आज राम मंदिराचे भूमीपूजन झाले. देशातील तमाम हिंदूंसाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. देशभरात आज दिवाळी साजरी होत आहे. पण सामान्य जनतेपेक्षा ३० वर्षांपूर्वी ज्यांनी या लढ्याची सुरुवात केली होती, त्यांचे आयुष्य आजच्या दिवसाने सार्थकी लागले. अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजन सुरू असताना इकडे मेहकरमधील श्रीराम मंदिरात ज्येष्ठ कारसेवक लक्ष्मीकांत मोहरील यांनी समाधानाने इहलोकाचा निरोप घेतला. कदाचित याच दिवसासाठी ते थांबले असावे आणि राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा डोळ्यांत साठवत त्यांनी अखेरचा निरोप घेतला.

१९९० पासून ते १९९२ पर्यंत राम मदिराच्या आंदोलनामध्ये लक्ष्मीकांत सक्रिय सहभागी होते. आज सकाळी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन सुरू असताना ते मेहकरमधील श्रीराम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीसमोर बसले होते. जुन्या आठवणींना उजाळा देत असताना लक्ष्मीकांत एकदम हसत खेळत मोठमोठ्याने श्रीरामाच्या नावाचा जयघोष करीत होते. अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि जागीच त्यांनी प्राण सोडले. उपस्थितांनी धावपळ केली, पण काही उपयोग झाला नाही. मंदिराचे भूमिपूजन झाल्यामुळे देशासाठी लढलेली लढाई आपण जिंकलो, अशा अर्विभावात त्यांनी प्राण त्यागल्याचेही बोलले जात आहे.

सन १९९२ मध्ये मेहकरमधून ‘रामलल्ला की सौगंध है, मंदिर वहीं बनायेंगे’, असा नारा त्यांनी दिला होता. त्या लढ्यात अयोध्येला ते गेले होते. देशभरातील कारसेवकांसोबत ते सहभागी झाले होते. तेथील विटाही त्यांनी सोबत आणल्या होत्या, असे त्यांचे समर्थक सांगतात. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर विजयी झाल्याचे समाधान होते, असेही उपस्थितांनी सांगितले. ते आज खूप आनंदी होते आणि अत्याधिक आनंदाच्या भरातच त्यांना हृदय विकाराचा झटका आला असावा, असाही तर्क लावला गेला. पण काहीही असो, समाधानाने त्यांनी जगाचा निरोप घेतला, असे मानले जात आहे.   (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com