माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनाने निधन

देवतळे यांना कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती.
 Sanjay Devtale, jpg
Sanjay Devtale, jpg

चंद्रपूर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते संजय देवतळे यांचे रविवार ( ता. 25 एप्रिल) निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील काही दिवसांपूसन त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. 

देवतळे यांना कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांनी चाचणी केली होती. यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मागील सहा दिवसांपसून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे निधन झाले. 

संजय देवतळे 4 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रीपदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणुक लढवली होती. मात्र त्यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागल, नुकताच त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेष केला होता.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करुन देवतळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गडकरी म्हणाले की ''राज्याचे माजी मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय नेते संजय देवतळे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. संजय देवतळे यांच्या निधनाने राज्याने एक संवेदनशील आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी गमावला आहे. ही चंद्रपूर जिल्ह्याची मोठी राजकीय आणि सामाजिक हानी आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com