खरा योद्धा : 85 वर्षांच्या आजोबांनी तरूणाला दिलं आपलं बेड अन् मृत्यूला कवटाळलं

नागपूरमधील नारायण भाऊराव दाभाडकर असे या 85 वर्षांच्या योद्धाचे नाव आहे.
Covid19 85 year old narayan dabhadkar gave his bed to other person
Covid19 85 year old narayan dabhadkar gave his bed to other person

नागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने देशातील सर्वच राज्यांमध्ये रुग्णांना बेड मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बेड अभावी काहींचा रुग्णालयाबाहेरच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बेड मिळत नसल्याने अनेकच जण घरीच उपचार घेत असून गंभीर होत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णालयात एखादा बेड मिळूनही तो दुसऱ्या रुग्णासाठी सोडून देणे, अशा घटना घडणे दुरापास्तच. पण नागपूरमध्ये हा त्याग एका 85 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने केला.

नागपूरमधील नारायण भाऊराव दाभाडकर असे या 85 वर्षांच्या योद्धाचे नाव आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने नागपूरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी एक महिला आपल्या तरूण पतीसाठी रुग्णालयात बेड शोधण्यासाठी आली होती. त्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर ते बेड देण्यास तयार झाले. "मी आता 85 वर्षांचा झालो आहे. आयुष्य पाहिले आहे. पण जर या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तर त्यांची मुलं अनाथ होतील. त्यामुळं त्या व्यक्तीचे प्राण वाचविणे हे माझे कर्तव्य आहे," असे म्हणत त्यांनी बेड सोडून दिला. 

दाभाडकर यांची अॅाक्सीजन पातळी 60 पर्यंत पोहचल्याने त्यांची मुलगी व जावयाने त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले होते. खूप प्रयत्नानंतर त्यांना हा बेड मिळाला होता. त्याचवेळी 40 वर्षांच्या आपल्या पतीसाठी महिला बेड शोधत होती. बेड नसल्याने ही महिला रडत असल्याचे दाभाडकर यांनी पाहिले होते. त्यानंतर त्यांनी बेड देण्याचा निर्णय घेतला. 

रुग्णालय प्रशासनाने दाभाडकर यांच्याकडून बेड देत असल्याचे लिहून घेतले. त्यानंतर दाभाडकर यांना घरी आणण्यात आले. घरी तीन दिवसानंतरच त्यांचे निधन झाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर दाभाडकर यांच्या त्यागाचे कौतुक केले आहे. 

दाभाडकर हे आरएसएसचे कार्यकर्ते

नारायण दाभाडकर हे आरएसएसचे कार्यकर्ते असल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले आहे. दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवत नारायणजी यांनी तीन दिवसांत जगाचा निरोप घेतला. समाज आणि राष्ट्राचे खरे सेवकच असा त्याक करू शकतात. आपल्या पवित्र सेवाभावाला प्रणाम. तुम्ही समाजासाठी प्रेरणास्त्रात आहेत, असे ट्विट चौहान यांनी केले आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com