‘महापालिका पाठवते खासगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्ण?’ अधिकाऱ्यांनीच उघडे पाडले पितळ

कोरोनाबाधितांबाबत महापालिकेची जबाबदारी काय? असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. पालिकेची जबाबदारी केवळ प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविणे एवढेच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. असे आहे तर पाच हॉस्पिटलवर खर्च का केला? या प्रश्नावर एकाही अधिकाऱ्याला उत्तर देणे शक्य झाले नाही.
nmc-nagpur
nmc-nagpur

नागपूर : मेयो, मेडिकल आणि एम्सच्या तुलनेत खासगी रुग्णालये ‘हाऊसफुल्ल’ असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यावर कळस म्हणजे मेयो आणि मेडिकलमध्ये निम्म्या खाटा रिकाम्या असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच स्थायी समितीच्या बैठकीत कबूल केले. त्यानंतर पालिकेच्या सुविधा केंद्रावर नागरिकांनी फोन केल्यास त्यांना मेयो, मेडिकलमध्ये जागा नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी केला. त्यामुळे पालिकेकडून खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधितांची रसद तर पुरविली जात नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महापालिकेत आज स्थायी समितीची बैठक पार पडली. स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी कोरोनासंदर्भात आढावा घेतला. या बैठकीत अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. शहरातील रुग्णालयातील खाटा किती रिकाम्या आहेत, याबाबत झलके यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केला. मेडिकलमध्ये सहाशे खाटा असून सद्यस्थितीत ३०६ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. मेयोमध्ये सहाशे खाटा असून येथे ३२४ कोरोनाबाधित आहेत. एम्समध्ये ६४ खाटा असून ३५ रुग्ण आहेत. लता मंगेशकर हॉस्पीटलमध्ये ९० खाटा असून केवळ चार रुग्ण आहेत. शालिनीताई मेघे रुग्णालयात ३६० खाटांची सोय असून येथे केवळ दोन रुग्ण आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी स्थायी समिती अध्यक्षांना दिली. त्याचवेळी खाजगी रुग्णालये कोरोनाबाधितांनी शंभर टक्क्यांपर्यंत हाऊसफूल्ल असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमुद केले. मात्र नागरिकांनी फोन केल्यानंतर महापालिकेकडून मेयो, मेडिकलमध्ये खाटा रिकाम्‍या नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा गंभीर आरोप झलके यांनी केला.

मनपा रुग्णालयांची कामे अपूर्ण
या बैठकीत महापालिकेने तयार केलेल्या एकाही रुग्णालयात एकही कोरोनाबाधित दाखल नाही किंबहुना एकही खाट नाही. या रुग्णालयांचे काम अपूर्ण असल्याचे तसेच मनुष्यबळ व प्रशिक्षित कर्मचारी नसल्याची प्रांजळ कबुली देत अधिकाऱ्यांनीच पालिकेचे पितळ उघडे पाडले. एकही हॉस्पिटल अद्ययावत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे झलके यांनी पत्रकारांना सांगितले. विशेष म्हणजे आयुक्तांनी या रुग्णालयांसाठी तत्काळ २४ तासांची निविदा काढून आता दोन महिन्यांचा अवधी होत आहे.

अधिकाऱ्यांनी केले हात वर
कोरोनाबाधितांबाबत महापालिकेची जबाबदारी काय? असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. पालिकेची जबाबदारी केवळ प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविणे एवढेच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. असे आहे तर पाच हॉस्पिटलवर खर्च का केला? या प्रश्नावर एकाही अधिकाऱ्याला उत्तर देणे शक्य झाले नाही. एवढेच नव्हे मनपाने पॉझिटिव्ह घोषित केलेल्या रुग्णाला मेडिकलने निगेटिव्ह घोषित केल्याबाबत डॉ. सवाई अनभिज्ञ होते, असेही झलके यांनी सांगितले.    (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com