भाजपवाल्यांची तृष्णा त्यांना केवीलवाणी बनवतेय : डॉ. नितीन राऊत 

आजची राजकीय परिस्थिती अतीषय स्फोटक झाली आहे आणि या स्थितीमध्ये जोपर्यंत भारतीय संविधान पूर्णपणे मानला जात नाही, तोपर्यंत ही स्थिती बदलणार नाही. संविधानाला छिन्नविछीन्न करण्याचा प्रकार देशात होतो आहे. हे निषेधार्ह आहे, हा प्रकार थांबविणे गरजेचे झाले आहे. त्यासाठीच आजचे आंदोलन असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
Congress Andolan
Congress Andolan

नागपूर : राजकीय तृष्णा असावी, ती असणे काही वाईट नाही. पण महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून भाजपवाल्यांचा मनात प्रचंड खदखद आहे, ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. मग देशातील, राज्यातील परिस्थिती काय आहे, याचादेखील हे लोक विचार करत नाहीत. पण कोरोनाच्या लढ्यात महाविकास आघाडी सरकारने उत्तम काम केले आहे, करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक मंत्री, प्रत्येक आमदाराच्या संपर्कात आहेत आणि तिन्ही पक्ष एकमेकांना सहकार्य करीत आहेत, असे राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आज माध्यमांशी बोलताना म्हणाले. 

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, आज सदर येथे राज भवनच्या समोर कॉंग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे दिल्यानंतर कॉंग्रेसच्या शिष्टमंडळातर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांना निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात डॉ. नितीन राऊत यांच्यासोबत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री सतीष चतुर्वेदी, गेव्ह आवारी, अनिस अहमद यांचा समावेश होता. देशात ज्या पद्धतीने मध्यप्रदेशातील सरकार पाडण्यात आली. त्यानंतर आता राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी भाजपचे शिर्षस्थ नेते काम करताहेत. याचा निषेध राज्यपालांना दिलेल्या निवेदनातून आम्ही नोंदविला असल्याचे डॉ. राऊत यावेळी म्हणाले. 

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. लोकशाही टिकविण्याचं काम केंद्रातील सरकारचं असतं. विशेष करुन देशाच्या राष्ट्रपतींकडे भारतीय संविधानाची सुरक्षा करण्याचं मोठ काम आहे. या देशाची एकता, संविधान सुरक्षित राहीलं पाहीजे आणि लोकशाहीने निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा सन्मान झाला पाहीजे. या सर्व बाबींवर महामहिम राज्यपालांशी आमच्या शिष्टमंडळाने सर्वंकष चर्चा केल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले. आम्ही दिलेले निवेदन राष्ट्रपतींकडे निश्‍चितपणे पाठविणार असल्याचे राज्यपालांनी शिष्टमंडळाला सांगितल्याचेही ते म्हणाले. 

राजकीय स्थिती झाली स्फोटक 
आजची राजकीय परिस्थिती अतीषय स्फोटक झाली आहे आणि या स्थितीमध्ये जोपर्यंत भारतीय संविधान पूर्णपणे मानला जात नाही, तोपर्यंत ही स्थिती बदलणार नाही. संविधानाला छिन्नविछीन्न करण्याचा प्रकार देशात होतो आहे. हे निषेधार्ह आहे, हा प्रकार थांबविणे गरजेचे झाले आहे. त्यासाठीच आजचे आंदोलन असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com