...तर सरकार पाडून दाखवा : अशोक चव्हाण कडाडले - Ashok Chavan Challenges BJP To Topple the govrnment | Politics Marathi News - Sarkarnama

...तर सरकार पाडून दाखवा : अशोक चव्हाण कडाडले

चेतन देशमुख
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

सरकार पडेल अशा वावळ्या विरोधकाडून उठविल्या जात आहे. सरकार पाडण्यासाठी विरोधक केवळ तारीख देण्यातच मग्न आहेत. त्यांनी सरकार पाडून दाखवावेच, त्यांना महाविकास आघाडीची ताकद दाखवू अशा दम राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला.

यवतमाळ  : सत्तेत राहून केवळ मौजमजा करायची नाही, सर्वसामान्यांचे काम तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. विरोधकांनी कितीही आगडोंब केली, तरी पाच वर्ष महाविकास आघाडीची सरकार राहिल. त्यांनी सरकार पाडून दाखवावे, आम्ही महाविकास आघाडीची ताकद दाखवू असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाचे नाव न घेता विरोधकांना दिला.

ते जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे एमडब्यु पॅलेस येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, मदत व पुर्नवर्सन मंत्री विजय वड्डेटीवार, नितीन कुंबलकर, आशिष दुआ, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, खासदार बाळू धानोरकर, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, सचिन नाईक, वामनराव कासावार, जिल्हाध्यक्ष वझाहत मिर्झा, सध्या सव्वालाखे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल ठाकरे, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडी कडून सर्वसामान्याच्या प्रश्‍नाला न्याय देण्याचे काम सुरु आहे. शेतकर्‍यांपासून तर बेरोजगारापर्यंत सर्वांना हे सरकार मदत करीत आहे. विरोधकांना बोलण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही, त्यामुळेच सरकार पडेल अशा वावळ्या विरोधकाडून उठविल्या जात आहे. सरकार पाडण्यासाठी विरोधक केवळ तारीख देण्यातच मग्न आहेत. त्यांनी सरकार पाडून दाखवावेच, त्यांना महाविकास आघाडीची ताकद दाखवू अशा दम राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला.

काही दिवसांपुर्वीच दसरा मेळ्यावात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला थेट आव्हान केले होते. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्र्यांनीही तशाच पद्धतीने भाजपाचे नाव न घेता आव्हान दिले आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख