अनिल देशमुख आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार  - Anil Deshmukh to Challege High Court order in Supreme Court | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

अनिल देशमुख आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबाँबनंतर काल मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्राथमिक चौकशीचा आदेश दिला आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता या प्रकरणात अनिल देशमुख आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. 

नागपूर : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांच्या लेटरबाँबनंतर काल मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्राथमिक चौकशीचा आदेश सीबीआयला (CBI) दिला आहे. त्यानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता या प्रकरणात अनिल देशमुख आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. Anil Deshmukh to Challege High Court order in Supreme Court

राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी काल रात्री उशिरा ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज सकाळी सुप्रीम कोर्टात (Supreme Court of India) इ फायलिंग द्वारा याचिका दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, अनिल देशमुखांवर परमबीरसिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. लवकरच या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. Anil Deshmukh to Challege High Court order in Supreme Court

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआयने (CBI) प्राथमिक चौकशी करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. मुंबईच्या अॅड. जयश्री पाटील यांनी न्यायालयात देशमुख तसेच वाझे यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी रिट याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला. सीबीआयने येत्या १५ दिवसांत चौकशी करुन न्यायालयाला अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात चौकशी करावी, सध्या गुन्हा दाखल करु नये किंवा जयश्री पाटील यांची तक्रारही नोंदवून घेऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख