राम शिंदेसोबत काल होते आणि आज थेट भाजपचा राजीनामा पाठवून दिला...

नामदेव राऊत यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
namdeo raut.jpg
namdeo raut.jpg

अहमदनगर : कर्जत येथे भाजप युवा मोर्चा व ओबीसी सेलच्या वतीने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या बरोबर कर्जतमधील नगरपरिषदेचे पहिले अध्यक्ष व माजी मंत्री राम शिंदे यांचे विश्वासू नामदेव राऊतही होते. पण काल राम शिंदे बरोबर दिसलेल्या राऊत यांनी आज अचानक भाजपला अखेरचा रामराम केल्याची घोषणा केली. Yesterday I was with Ram Shinde and today I sent the resignation of BJP directly ...

नामदेव राऊत यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. तसेच आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा...

कर्जत नगरपरिषदेची लवकरच निवडणूक आहे. त्यादृष्टीने कर्जतमधील राजकीय हलचालींना वेग आला आहे. नामदेव राऊत यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला कर्जतमध्ये आणखी एक धक्का बसला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपचे किती नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर जातात यावर कर्जतमध्ये राजकीय चर्चा रंगली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नुकतेच कर्जतमध्ये येऊन गेले. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा केली होती. चंद्रकांत पाटील जाताच आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील भाजपच्या चाणक्य समजले जाणाऱ्या प्रकाश ढोकरीकरांसह चार जणांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला होता. त्यामुळे भाजपचे बडे नेते कर्जतमध्ये आले की दुसऱ्या दिवशी भाजपला गळती लागते, चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा...

नामदेव राऊत व प्रकाश ढोकरीकर हे कर्जतच्या राजकारणातील मोठे नेते मानले जातात. हेच नेते गमावल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. राऊत यांनी त्यांचा राजीनामा अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे पाठवून दिला आहे. विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांच्या पराभवापासून कर्जत तालुक्यात भाजपची ताकद कमी होऊ लागल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com