मंदिर बचाव आंदोलनात सहभागी होईल ः अण्णा हजारे

अण्णा हजारे म्हणाले की, राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडलेली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढत नाही का?
मंदिर बचाव आंदोलनात सहभागी होईल ः अण्णा हजारे
anna hajare.jpg

राळेगणसिद्धी : अहमदनगर येथील मंदिर बचाव समितीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. यावेळी मंदिरे उघडण्यासाठी समितीने अण्णा हजारे यांना साकडे घातले. यावेळी मंदिर बचाव समितीचे प्रमुख तथा भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनील पंडित, बाळासाहेब भुजबळ, बापू ठाणगे, बाळासाहेब खताडे, गणेश पलंगे आदी उपस्थित होते.

अण्णा हजारे म्हणाले की, राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडलेली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढत नाही का? सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले? 

हेही वाचा...

मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितीने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल अशी ग्वाही हजारे यांनी दिली असल्याची माहिती वसंत लोढा यांनी दिली. 

मंदिर बचाव कृतीसमितीचे वसंत लोढा यांनी यापूर्वी झालेल्या विविध आंदोलनाची माहिती देऊन पुढील काळात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले.
 
समाजाला मंदिरेच तारू शकतात    
अण्णा हजारे म्हणाले, भरकटत चालेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात. यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे. ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. आज माझे ८४ वय झाले आहे. मात्र माझ्यावर आजवर कोणताच डाग नाहीये. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीजवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालोय. संतांचे विचार देणारे मंदिरे का बंद केली. सरकारला संतांचे विचार काय समजले ? त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलून लवकर मंदिरे उघडावीत. अशा शब्दांत हजारे यांनी सरकारला सूचना केली आहे.

Edited By - Amit Awari

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in