राष्ट्रीय क्रीडा दिनी क्रीडा राज्य मंत्री खुले करणार का जिल्हा क्रीडा संकुल - Will the Minister of State for Sports open the District Sports Complex on National Sports Day | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

राष्ट्रीय क्रीडा दिनी क्रीडा राज्य मंत्री खुले करणार का जिल्हा क्रीडा संकुल

अमित आवारी
शनिवार, 28 ऑगस्ट 2021

राज्याच्या क्रीडा राज्य मंत्री आदिती तटकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. उद्या (रविवारी) राष्ट्रीय क्रीडा दिनी त्या जिल्हा क्रीडा संकुलाला भेट देणार आहेत.

अहमदनगर ः कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंची मोठी नुकसान होत आहे. जिल्हा क्रीडा संकुलात कोणत्याही स्पर्धा होत नाहीत. जिल्ह्यातील हे सर्वात मोठे मैदान आहे. मात्र या मैदानात स्पर्धांना बंदी आहे. 

राज्याच्या क्रीडा राज्य मंत्री आदिती तटकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. उद्या (रविवारी) राष्ट्रीय क्रीडा दिनी त्या जिल्हा क्रीडा संकुलाला भेट देणार आहेत. आमदार संग्राम जगताप यांनीही हे क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुले व्हावे या संदर्भातील निवेदने जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. त्यामुळे आठवड्याभरापूर्वी क्रीडा संकुल सरावासाठी सर्वांना खुले झाले आहे. 

हेही वाचा...

तहसीलदार देवरेंच्या विरोधात आता आरोग्य कर्मचारी संपावर जाणार...

जिल्ह्यात खो-खो, कब्बडी, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आदी खेळांचे राष्ट्रीय खेळाडू आहे. सध्या राज्य व राष्ट्रीय पावसाळी स्पर्धा सुरू आहे. मात्र जिल्ह्यात या तालुका व जिल्हा स्पर्धांसाठी क्रीडा संकुलेच स्पर्धांसाठी सुरू नाहीत. एखाद्या खेळाडूची कारकिर्द जास्तीत जास्त 10 ते 12 वर्षांची असते. या कारकिर्दीतील दोन वर्षे वाया गेल्याने खेळाडूंच्या करिअरचा प्रश्न निर्माण झाला आहे.

क्रीडा संकुलात खेळाडूंना सराव सुरू झाला आहे मात्र तत्पूर्वी खेळाडूंनी जिल्ह्यातील रस्ते, रिकाम्या जागांत सराव सुरू ठेवला होता. रस्त्यांवर सराव केल्यामुळे खेळाडूंच्या हाडांची झिज होण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्यावर अपघातही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रीडा संघटनांची चिंता वाढली आहे. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यामुळे क्रीडा संकुलातील सराव सुरू झाला आहे.

हेही वाचा...

नगरच्या एमआयडीसीवरून राजकारण तापण्याची चिन्हे

आदिती तटकरे उद्या (रविवारी) जिल्हा क्रीडा संकुलाला भेट देणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या कामाची पाहणीही करणार आहेत. यावेळी त्यांच्या समवेत आमदार संग्राम जगतापही असणार आहेत. त्यामुळे क्रीडा दिनापासून क्रीडा संकुलांत सर्धा सुरू होतील अशी आशा आहे. 

सध्या जिल्हा क्रीडा संकुलाची दुरवस्ता झाली आहे. येथे लॉन तयार करण्याचा प्रस्तावही प्रलंबित आहे. मुख्य मैदानातील प्रेक्षक आसनांजवळील शौचालयांची मोडतोड झाली आहे. मैदानांत गवतही वाढलेले आहे. अशा स्थितीत राज्यमंत्र्यांचा हा दौरा जिल्हा क्रीडा संकुलाला नवीन उजाळा देईल का? अशी चर्चा आज नगर जिल्ह्यात आहे.

आखाडा कधी होणार
जिल्हा क्रीडा संकुल तयार करताना नेहरू आखाडा पाडण्यात आला. हा आखाडा कोल्हापूरमधील आखाड्यांच्या धरतीवर तयार करण्यात आला होता. आखाड्यात कोठेही बसून कुस्ती स्पर्धेचा आनंद घेता येत होता. जिल्हा क्रीडा संकुल बांधताना आखाडा बनविण्याचे प्रशासनाने कबुल केले होते मात्र आज तागायत आखाडा तयार करण्यात आलेला नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख