नगरमध्ये अजित पवारांच्या पाॅवरला कोण लावतयं ब्रेक?

शिर्डी साई संस्थानमधील नियुक्त्यांवरून सध्या अजित पवार समर्थकांत नाराजी आहे...
ajit pawar
ajit pawar

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील स्थानिक पातळ्यांवरील नियुक्त्यांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा शब्द अंतिम मानला जातो. पण नगर जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांना तसे वाटत नसावे. कारण महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिर्डी (Shirdi Sai Sansthan) येथील साईबाबा संस्थानात त्यांच्या समर्थकांना पुरेसे स्थान मिळाले नसल्याची त्यांच्यात चर्चा आहे.

या संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती निश्चित झाली आहे. महाविकास आघाडीच्या सत्तावाटपात या संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे गेले आहे. उपाध्यक्षपदी सेनेचे नेते रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती झाली आहे. यासाठीची अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. पण या नियुक्त्यांबद्दल संबंधितांच्या समर्थकांनी त्यांचे अभिनंदनही केले आहे. 

या संस्थानवर नियुक्तीसाठी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे देखील प्रयत्नशील होते. अजित पवार यांचे ते जवळचे समजले जातात. त्यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांचे नाव डावलत जयंत जाधव यांचे नाव देण्यात आल्याचे समजते.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील हे अजित पवारांच्या सर्वाधिक जवळचे मानले जातात. ते  उपाध्यक्षपदासाठी इच्छुक होते. पक्ष त्यांना विश्वस्तपद द्यायला तयार होता मात्र त्यांनी त्यास नकार दिला. मात्र हा नकार देताना आपण कोणत्याही पदाला इच्छुक नसल्याचे सांगत मनातील नाराजीही व्यक्त केली.

अजित पवार यांच्या नात्यातील अजित कदम यांचे नाव शेवटच्या यादीत देखील होते. ते डावलून मंत्री प्राजक्त तनपुरे समर्थक सुरेश वाबळे यांना संधी देण्यात आली आहे.  याशिवाय अजित पवार समर्थक शिरूरचे आमदार अशोक पवार व आमदार संग्राम जगताप यांनी देखील काही नावं सुचवली होती ती देखील डावलण्यात आली. याशिवाय महेंद्र शेळके, संदीप वर्पे हे देखील राष्ट्रवादीच्या इतर ज्येष्ठ मंत्र्यांच्या कोट्यातून निश्चित झाल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com