मतदारसंघ विकासाचे मॉडेल बनवायचा आहे - आमदार रोहित पवार

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मतदारसंघ विकासाचे मॉडेल बनवायचा आहे - आमदार रोहित पवार
Rohit pawar1.jpg

कर्जत : कर्जत नगरपंचायतची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नुकतेच कर्जतमध्ये येऊन गेले. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा केली होती. चंद्रकांत पाटील जाताच आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील भाजपच्या चाणक्य समजले जाणाऱ्या प्रकाश ढोकरीकरांसह चार जणांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीपूर्वी भाजपला कर्जतमध्ये मोठे खिंडार पडले आहे.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील काल (ता. 31) कर्जतमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. या प्रसंगी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, ते गेले की पाठविले, याबाबत निरीक्षण करावे लागेल, मात्र गर्दी तिकडे आणि मतदान इकडे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी नगरपंचायत निवडणुकीत जिल्हा बँकेची पुनरावृत्ती होईल पानगळ झाली की नवीन पालवी फुटते. हा निसर्गाचा नियम आहे. भाजप हा देशव्यापी सर्वात मोठा पक्ष असून, तो वाढीमध्ये गेलेल्यांचे योगदान मोठे आहे, हे नाकारून चालणार नाही. ते जेथे गेले आहेत, तेथे प्रामाणिकपणे राहत तो पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले होते. 

हेही वाचा...

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या संदर्भात आमदार रोहित पवार म्हणाले, शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी वजाबाकी नव्हे, तर बेरजेचे राजकारण करीत सर्वांना सामावून घेत मतदारसंघ विकासाचे मॉडेल बनवायचा आहे. कर्जत- जामखेडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. यासाठी चांगले काम करू शकतील आणि सर्वांगीण विकासावर ज्यांना विश्वास आहे, अशाच कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी बोलून विनाशब्द स्वागत करतो आहे.

हेही वाचा...

या वेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष प्रा. विशाल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मनीषा सोनमाळी, कार्याध्यक्षा डॉ. शबनम इनामदार, ऋषिकेश धांडे, सतीश पाटील, सचिन मांडगे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in