...पुढेही आम्ही एकत्र जाऊ शकतो

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाच्या पाहणीसाठी आले होते.
balasaheb thorat 1.jpg
balasaheb thorat 1.jpg

अहमदनगर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची महाविकास आघाडीची सत्ता आहे. ही सत्ता स्थापन झाल्यापासून भाजप नेत्यांकडून हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही असे वक्तव्य करण्यात येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे व माजी मंत्री राम शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल असे भाकीत केले आहे. ... We can still go together

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाच्या पाहणीसाठी आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्या विषयी विचारले. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ते असे का म्हणाले हे खर तर त्यांनाच विचारले पाहिजे. महाविकास आघाडीत भाजपचे अनेक लोक येऊ इच्छित आहेत. ते आमचे भावी सहकारी होतील. 

हेही वाचा...

भारतीय जनता पक्षाची एकंदर अवस्था व त्यांच्या नेत्यांत निर्माण झालेले नैराश्य पाहता कुणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातेय, कोणी काँग्रेसमध्ये जाते आहे तर कुणी शिवसेनेत. त्यामुळे ते भावी सहकारी होऊ शकतात. 

नैराश्यातून अनेक गोष्टी घडत असतात. राज्यात काही बदल होणार नाहीत. त्यांचे दोन वर्ष सरकार पडेल असे म्हणता म्हणता झाले. आणखी तीन वर्ष होतील आणि पुढेही आम्ही एकत्र पद्धतीने जाऊ शकतो, असे सूचक विधान मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

बाळासाहेब थोरात यांच्या विधानाचे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचे विधान आज महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com