दिवाळीपर्यंत थांबा, आपलंच सरकार येणार आहे

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, थोडं थांबा. दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे.
sujay vikhe.jpg
sujay vikhe.jpg

अहमदनगर ः कर्जत नगरपंचायतची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नुकतेच कर्जतमध्ये येऊन गेले. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा केली होती. चंद्रकांत पाटील जाताच आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील भाजपच्या चाणक्य समजले जाणाऱ्या प्रकाश ढोकरीकरांसह चार जणांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीपूर्वी भाजपला कर्जतमध्ये मोठे खिंडार पडले आहे.

भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील काल (ता. 31) एका लसीकरण केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त कर्जत तालुक्यात आले होते. तेव्हा त्यांना भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, नगरसेवक लालासाहेब शेळके, देविदास खरात आणि नगरसेविका मंगल तोरडमल यांचे पुत्र नितीन तोरडमल यांनी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे सृजन हाऊसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याबाबत खासदार डॉ. विखे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न केले.

यावर खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले होते की, थोडं थांबा. दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील आज पाथर्डी व शेवगाव येथील पूर परिस्थिती पाहणी दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी कर्जत मधील त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले, कर्जतमधील कार्यकर्ते वारंवार तक्रार करत होते. तेथे महाविकास आघाडीचे आमदार आहेत. तिथे होणारा लोकांना त्रास, लोकांना कामात टक्केवारी मागितली जात आहे. या त्रासाचा उद्रेक होऊन ते बोलत होते. म्हणून मी त्या ठिकाणी म्हणालो, की काळजी कू नका. दिवाळीपर्यंत थांबा. दिवाळीनंतर सगळी कामे होतील. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणे आमचे काम आहे. कोणाचेही सरकार यावे हे प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते. म्हणून भाजपचा खासदार म्हणून मलाही तसेच वाटते.

राज्यात जनतेने सत्ता आमच्याकडे दिलेली होती. हे अपघाती सरकार आहे. त्यांचा कारभार पाहता लोक एवढे हताश झाले आहेत. की, नियोजनामध्ये कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने या वाक्याचा वापर केला. 

आम्हाला विश्वास आहे, आमची अपेक्षा आहे. लवकरात लवकर आमचे सरकार येईल, असे आम्ही म्हणत आहोत. व कायम म्हणत राहणार. यात चुकीचे काहीच नाही. कारण ज्या पद्धतीने दोन वर्षांत जनतेचे हाल झाले आहेत. पूरग्रस्तांना जुन्याच पंचनाम्यांचे पैसे आलेले नाहीत, अशा परिस्थितीमध्ये जनता त्यांना उखाडून फेकेल, असा माझ्या बोलण्याचा अर्थ आहे, असे स्पष्टीकरण खासदार डॉ. विखे पाटील यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in