विश्वजित कदम यांनी मावसभावाला जिल्हाध्यक्ष केले

जिल्हाध्यक्षपद मिळवण्यासाठी वसंतदादा गटाने जोरदार प्रयत्न केले होते. तथापि कदम गटाने या पदावर जतचे आमदारसावंत यांना संधी देत पुन्हा एकदा जिल्हा काँग्रेस वरील वर्चस्व सिद्ध केले आहे.
विश्वजित कदम यांनी मावसभावाला जिल्हाध्यक्ष केले
sangali.jpg

सांगली : राज्यासाठी लक्षवेधी ठरलेल्या प्रक्रियेत राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मावसभावाची जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार विक्रमसिंह सावंत यांची निवड झाली आहे. या पदासाठी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. यात राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे राजकीय वजन भारी ठरले. नाना पटोले यांनी आज ही निवड जाहीर केली. विशाल पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.


यावेळी जिल्हाध्यक्षपद मिळवण्यासाठी वसंतदादा गटाने जोरदार प्रयत्न केले होते. तथापि कदम गटाने या पदावर जतचे आमदार  सावंत यांना संधी देत पुन्हा एकदा जिल्हा काँग्रेस वरील वर्चस्व सिद्ध केले आहे. ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम सुमारे वीस वर्षांपासून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

विशाल पाटील यांनी या पदासाठी जिल्हाभरातून मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि त्यांना पक्षाने प्रदेश उपाध्यक्ष पदावर संधी देत जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत गटातील वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा...


आमदार सावंत काँग्रेसमध्ये कदम गटाचे निष्ठावान आमदार मानले जातात. भाजपचे उमेदवार व तत्कालीन विद्यमान आमदार विलासराव जगताप यांचा पराभव करून श्री सावंत यांनी जत विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसकडे खेचला. आता पक्षाने श्री सावंत यांच्यावर जबाबदारी सोपवताना जिल्ह्याची धुरा युवा  नेतृत्वाकडे दिली आहे. सध्या शहर जिल्हाध्यक्षपदी पृथ्वीराज पाटील  आहेत. नव्या निवडींबाबत वसंतदादा गटाची प्रतिक्रिया स्पष्ट झालेली नाही . कदम गटाकडून स्वागत झाले आहे.


काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हाध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील प्रत्येक खेडोपाडी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करू. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक व त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारू. शिवाय पक्षाने दिलेल्या संधीला योग्य न्याय देऊ . 

-   आमदार विक्रमसिंह सावंत

 

नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
विशाल पाटील हेदेखील जिल्हाध्यक्ष होण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदी वर्णी लावून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. विशाल पाटील हे वसंतदादा घराण्याचा चेहरा आहेत आणि आक्रमक आहेत. ते नेमके या निवडी बाबत काय प्रतिक्रिया व्यक्त करतील हे देखील महत्त्वाचे आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in