त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही ! राणे, खोत यांच्या टीकेला रोहित पवारांचे खरमरीत उत्तर

कोकणपट्टीत अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. तेथील जनतेला मदतीची गरज आहे. बहुतेक नेते आपापल्या परीने तेथे मदत पोहचविण्याचे काम करीत आहेत.
Rohit pawar1.jpg
Rohit pawar1.jpg

नगर ः कोकणात अतिवृष्टीमुळे सर्वच पक्षांचे नेत्यांनी दौरे सुरू केले. सरकारी यंत्रणेवरील ताण वाढू नये म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आवाहन करताना ज्या नेत्यांचा त्या भागाशी खूप संबंध नाही, त्यांनी दौरे करू नये, असे सांगिले होते. मात्र त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी या भागाचा दौरा केला. त्यावर माजीमंत्री सदाभाऊ खोत व आमदार नितेश राणे यांनी टीकेची झोड उठविली. याबाबत आमदार रोहित पवार यांनी खरमरीत शब्दांत राणे व खोत यांचा समाचार घेतला आहे. (They don’t need to be valued! Rohit Pawar's honest answer to Rane and Khot's criticism)

कोकणपट्टीत अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. तेथील जनतेला मदतीची गरज आहे. बहुतेक नेते आपापल्या परीने तेथे मदत पोहचविण्याचे काम करीत आहेत. काहीजण मात्र चमकोगिरी करताना दिसतात. त्यामुळे तेथील प्रशासनावर मोठा ताण येत आहे. हे टाळण्यासाठी शरद पवार यांनी आवाहन केले होते. त्या भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांनी दौरे टाळावेत. मदत सर्वांनी करावी, असे त्यांनी म्हटले होते. याच दरम्यान आमदार रोहित पवार यांचा दौरा झाला. हाच धागा पकडून राणे व खोत यांनी ट्विटरवरून पवार यांच्यावर टीका केली. 

राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करू नयेत, असं आजोबांनी सांगितलं. आजोबांच्या सल्ल्याला नातूच मानत नाही. कर्जत जामखेडचे आमदार चीपळूनच्या दौऱ्यावर. आजोबांचा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिताच होता का, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला होता.

पवार कुटुंबियांत विसंगती असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे नियम का पाळावेत. रोहितजी थोडं शिकून मगच पुढील पाऊल टाकावी, असा माझा मैत्रीचा सल्ला आहे, असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले होते. 

या दोन्ही नेत्यांना उत्तर देताना आमदार रोहित पवार म्हणाले, की सोशल मीडियावर ट्विट करून मोकळं व्हायचं. मात्र, प्रत्यक्षात कुठेही जायंचं नाही. त्यामुळे या लोकांना महत््तव देण्याचं कारण नाही.

फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या कौल्हापूर दौऱ्याबाबत बोलताना पवार म्हणाले, संकट काळात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. फडणवीसही त्या भागात फित आहेत. माझीही त्यांच्याशी भेट झाली होती. 

दरम्यान, पूरग्रस्तांना मदत देतानाच सोशल मीडियावर रंगलेल्या या ट्विट युद्धामुळे राजकीय गोटात जोरदार चर्चा होत आहे.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com