...तर स्वतःच्या हातानं चौकात गळफास लावून घेईल - मेहबूब शेख

मेहबूब शेख यांनी त्यांच्या खास शैलीत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर घनाघाती टीका केली.
mehbob shekh.jpg
mehbob shekh.jpg

अहमदनगर : वनकुटे(ता.पारनेर) येथे वनकुटे ते वडगाव सावताळ रस्ता सुधारणा करणे 1 कोटी 20 लाख रूपये,वनकुटे ते पठारवाडी रस्ता सुधारणा करणे कामी 50 लाख रूपये,हनुमान नगर येथे पाणी पुरवठा लाईन करणे 25 लाख रूपये,व्यायाम साहित्य 5 लाख रूपये या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नीलेश लंके होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखही उपस्थित होते. या प्रसंगी भाषण करताना मेहबूब शेख यांनी त्यांच्या खास शैलीत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर घनाघाती टीका केली.

चित्रा वाघ यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांची नुकतीच पारनेरमध्ये येऊन भेट घेतली होती. तसेच आमदार नीलेश लंके यांच्यावर पत्रकार परिषद व सोशल मीडियावरून जोरदार टीका केली होती. तसेच मेहबूब शेख यांच्यावरही त्यांनी वेळोवेळी आरोप करत गुन्हाही दाखल केला होता. या सर्व प्रकरणाचा शेख यांनी त्यांच्या भाषणात समाचार घेतला.

हेही वाचा...

मेहबूब शेख म्हणाले, ज्यावेळी एखाद्या सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता स्वतःच्या मेहनतीवर स्वतःचे अस्थित्व निर्माण करतो. लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करत असतो. त्यावेळी ही गोष्ट कोणाच्यातरी डोळ्यात खुपते. त्यातन हा प्रकार झालेला आहे.

चित्रपटात आपण पाहतो. डाकूला एखाद्याला खल्लास करायला सुपारी द्यायचे, असे ऐकले होते. पण आता सुपारीची नवीन पद्धत निघाली आहे. एखाद्या चांगल्या माणसाला बदनाम करण्याची. नीलेश लंकेंचे जे प्रकरण आहे ते विचित्र पद्धतीने लोकांसमोर मांडले आहे. तसचं प्रकरण आमचंही झालं.

माझ्यावर पण एक आरोप झाला. त्या लंकेंच्या प्रकरणात त्या मुंबईवरून धावून आल्या. त्या लंके व माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना नीतिमत्ता शिकवायला निघाल्या आहेत. अहो! चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची ओळख आहे. आधी नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा. नंतर नीलेश लंके, मेहबूब शेख सारख्या पोरांना शिकवा.

हेही वाचा...

त्यांनी लाच कशाची मागावी माहिती आहे का? 1997ला गांधी हॉस्पिटलमध्ये ऑप्रेशन करताना एकाचा मृत्यू झाला. मृताच्या भावाने तक्रार केली. की रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाला. म्हणून यांचे पती किशोर वाघ यांनी तक्रारदाराला सल्ला दिला की, तू नोकरी माग व 15 लाखांची नुकसान भरपाई माग. हे सर्व करण्यासाठी त्याला 4 लाख रुपयांची लाच मागितली. ही फिर्यादीने त्याच्या फिर्यादीत म्हटले आहे. म्हणजे मेलेल्या माणसाच्या मढ्यावरील लोणी खाणारी औलाद तुम्ही. आम्हाला नीतिमत्ता शिकविताय. आधी नीतिमत्ता आपल्या घरात शिकवा आणि नंतर आमच्या सारख्या लोकांना शिकवायला या.

एसीबीने तपास केला त्याचा अहवाल आला आहे. त्यात किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. त्यांच्या उत्पन्नापेक्षा 90 टक्के जास्त रक्कम सापडली आहे. महाराष्ट्राला कळू द्या. वाघ काय खातो. तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो. 

महिलांबाबतचा आदर आम्हाला काय शिकवता. माझी नार्को टेस्ट करा. मी तयार आहे. मी दोषी नाही. तसेच तुम्ही ही पुढे या माझा नवराही दोषी नाही त्याची ही नार्को टेस्ट करा, असे सांगा. होऊन जाऊ द्या कोण किती नीतिमत्तेचे आहे.

राष्ट्रवादीत तुम्ही लोक नवीन आहात. पण पक्षातील जुने लोक त्यांना चांगले ओळखतात. म्हणून त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. मला भाजपमधीलच लोकांकडून कळाले आहे की, एखाद्या प्रकरणात नाव ओढून घेण्यासाठी 5 कोटी मागितले जातात. याबाबत मी नंतर बोलेलच आणि पुराव्यासह बोलेल.

माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे. त्याची कोणतीही चौकशी करा. जर दोषी असेल तर पवारांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. स्वतःच्या हाताने चौकात गळफास लावून घेईल, असे आव्हानच मेहबूब शेख यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com