इतरांची काळजी घेतो, तशी स्वतःची घे ! आमदार लंकेंना थेट शरद पवार यांचा फोन - Take care of others, take care of yourself! Sharad Pawar's phone call directly to MLA Lanka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

इतरांची काळजी घेतो, तशी स्वतःची घे ! आमदार लंकेंना थेट शरद पवार यांचा फोन

मार्तंड बुचुडे
रविवार, 2 मे 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून घरी आल्यानंतर आमदार नीलेश लंके यांना फोन केला होता.

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून घरी आल्यानंतर आमदार नीलेश लंके यांना फोन केला होता.

पवार म्हणाले, की नीलेश तू कोरोना रूग्णांसाठी मोफत कोविड सेंटर सुरू केले, ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. तू स्वतः त्यात जातीने लक्ष देत आहेस. त्या ठिकाणी रुग्णांची अतिशय चांगली व्वस्था ठेवली आहे, असे समजले. हे काम अतिशय चांगले आहे, पण हे करत असताना तू स्वतःचीही काळजी घे. काही अजचण आली, तर मला कळव. असा फोन करून मोठा अधार दिला आहे. 

आपल्या आमदार व खासदारांनी आपले एक महिन्याचे मानधन कोरोना विरोधातील लढाईसाठी द्यावे. तसेच पक्षाच्या वेल्फेअरमधून एक कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावा, अशा सूचना रूग्णलयातून घरी आल्यानंतर पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदार खासदारांना केल्या आहेत. त्यावेळी त्यांनी आमदार लंके यांना फोन करून त्यांचे कौतुक करत वरील वडिलकीचा सल्लाही दिला. त्यामुळे त्यांना मोठी ऊर्जा व प्रेरणा मिळाली आहे. अधिक प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली.

कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असताना तालुक्यात मोठी चिंता वाढली आहे. अनेकांचे मृत्यू सुद्धा झाले आहेत. राज्यात ऑक्‍सिजन आणि रेमडीसिव्हरचा मोठा तुटवडा जाणवत आहे. 

आमदार लंके यांचे कोरोना काळातील कामाचे राज्यभर कौतुक होत आहे. त्यांनी तालुक्यातील जनतेसाठी भाळवणी येथे एकहजार शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. येथे मोफत उपचार व जेवन सुद्धा दिले जात आहे. या कामाचे कौतुक पवार यांनी सुद्धा केले.

रूग्णालयातून घरी आल्यावर त्यांनी लंके यांना फोन करून ते करत असलेल्या कामाबद्दल कौतुक केले. 

फोनवर काय बोलले शरद पवार

नीलेश तू कोरोना रूग्णांना मोफत उपचार करण्यासाठी कोविड सेंटर सुरू केले, हे कौतुकास्पद आहे. तू स्वतः लक्ष घातले आहे. रूग्णांची काळजी घेतोस. तेथे चांगल्या मोफत वैद्यकीय सुविधा व जेवणही देत आहेस, हे काम अतिशय चांगले आहे, पण तू जशी रूग्णांची काळजी घेतो, तशी स्वतःचीही काळजी घे. काही लागल्यास मला कळव. 

 

Edired By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख