तहसीलदार देवरेंनी पकडला गणेश लंकेंचा वाळू चोरणारा ट्रक

तहसीलदार देवरे यांनी कार्यालयीन कामकाज सुरू केले आहे. पारनेर तालुक्याच्या दोन बाजूने नद्या वाहतात.
तहसीलदार देवरेंनी पकडला गणेश लंकेंचा वाळू चोरणारा ट्रक
jyoti devre.jpg

अहमदनगर : पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांचा ऑडिओ व्हायरल झाला होता. यात त्यांनी भावनिक होत पारनेरचे लोकप्रतिनिधी व महसूल प्रशासनातील वरिष्ठांना कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भुमिका घेतली होती. जिल्हा पोलिस प्रशासन व राज्य महिला आयोगाने तहसीलदार देवरे यांचे समुपदेशन केले होते. त्यामुळे देवरे या आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाल्या असे स्वतः देवरे यांनी प्रसार माध्यमांना सांगत मी दैनंदिन कार्यालयीन कामकाज सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले होते.

तहसीलदार देवरे यांनी कार्यालयीन कामकाज सुरू केले आहे. पारनेर तालुक्याच्या दोन बाजूने नद्या वाहतात. निघोज परिसरात वाळू तस्करी होत असल्याची माहिती तहसीलदार देवरे यांना मिळाली. त्यानुसार देवरे या त्यांच्या पथकासह निघोजला आज गेल्या होत्या. त्यावेळी नदी पात्रात अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शास आले. 

हेही वाचा...

निघोज येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाहन तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. तहसीलदार देवरे पाहताच वाहन चालक पसार झाला. या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. हा अवैधरित्या वाळू वाहतूक करत असलेला ट्रक क्र.MH 42 8886 हे आढळून आला. हे वाहन गणेश लंके यांच्या मालकीचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आमदार निलेश लंके विरुद्ध ज्योती देवरे असा संघर्ष गेले महिनाभर सुरू आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात देवरे यांनी लंके यांचे नावसाधर्म्य असलेला ट्रक पकडल्याने तालुक्यात साहजिक चर्चा सुरू झाली आहे. गणेश लंके हे निघोजचे रहिवासी आहेत. आमदार नीलेश लंके हे हंगे येथे वास्तव्यास आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in