आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आजपासून स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचा प्रारंभ

6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल.
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आजपासून स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचा प्रारंभ
Rohit pawar1.jpg

जामखेड : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात उंच भगव्या ध्वजाची 'स्वराज्य ध्वज पूजन' यात्रा आज कर्जतमधून सुरू होणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे.

महाराष्ट्राच्या पावन भूमीत देशातील नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज उभारणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेने लोकसहभागातून आणि सहकार्यातून आज सकाळी आठ वाजता ‘स्वराज्य ध्वज पूजन यात्रा’ कर्जत येथील ग्रामदैवत गोदड महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा...

हा 74 मीटर उंचीचा ध्वज दसऱ्याच्या मुहूर्तावर 15 ऑक्टोबर रोजी खर्डा येथील भुईकोट किल्ल्यावर बसविला जाणार आहे. हा स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापने तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड), आग्रा किल्ला(उत्तर प्रदेश), अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा 74 ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. 

त्यासाठी 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. निरंतर बदलते जग आणि तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव या सर्वांमध्ये आपल्या परंपरा जपून त्यांना पुढे नेण्याची गरज आहे.
 
कर्जत-जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी निजामाविरुद्ध हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावन भूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्टण म्हणजेच खर्ड्याचा भुईकोट किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर प्रेरणा, ऊर्जा देणारा 74 मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे. 

भगवा ध्वज हा आपल्या सर्वांचाच अभिमान, सर्वस्व आणि स्फूर्तिस्थान आहे. भगवा रंग हा कोणा एकाचा नव्हे तर तो सर्वांचा असून समानतेचा, एकीचा संदेश देणारा आहे. पाली वाङ्मयात अनेक ठिकाणी सर्वगुणसंपन्न गौतम बुध्दांना उद्देशून 'भगवा' शब्द आला आहे. सहिष्णुतेची शिकवण देणाऱ्या वारकरी संप्रदायाने खांद्यावरजी पताका घेतली ती भगव्याचीच छटा असलेल्या काव रंगातली. शीख धर्मामध्ये त्यागाचे आणि चैतन्याचे प्रतीक आहे. 

भगवा रंग, पगडीचा सर्वसामान्य रंगही भगवाच, पिवळ्या रंगाची सावली जिला बसंती म्हणतात ती भगव्याचीच छटा आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जून 1674 मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची 74 मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार 96 बाय 64 फूट असून वजन 90 किलो आहे. हा राज्यातीलच नाही तर जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज असणार आहे. 

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर (15 ऑक्टोबर) या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड), आग्रा किल्ला(उत्तर प्रदेश), अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा 74 ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. त्यासाठी 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. निरंतर बदलते जग आणि तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव या सर्वांमध्ये आपल्या परंपरा जपून त्यांना पुढे नेण्याची गरज आहे.
 
या कार्यक्रमाचा प्रारंभ आज सकाळी ८ वाजता कर्जत येथील संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरातील पूजेने झाला. त्यानंतर दुपारी 3 वाजता जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर नेऊन तिथंही पूजा केली जाईल. 


 
“महाराष्ट्राला भव्य ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वैभवशाली परंपरा लाभली आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या खर्डा किल्ल्याच्या या भूमीला संवर्धित करून आपल्या इतिहासाची माहिती आणि ‘स्वराज्य ध्वज’ उभारणीतून आपल्या परंपरेला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील लोकसहभागातून हा प्रयत्न केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत या ‘स्वराज्य ध्वज’ उभारणीसाठी आपला सर्वांचा सहभाग आणि लाभलेले सहकार्य यासाठी मी आपला आभारी आहे.”
 
- आमदार रोहित पवार

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in