चंद्रकांत पाटलांची पाठ फिरताच.. रोहित पवारांनी भाजपला पाडले खिंडार!

कर्जत नगरपंचायतची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नुकतेच कर्जतमध्ये येऊन गेले.
चंद्रकांत पाटलांची पाठ फिरताच.. रोहित पवारांनी भाजपला पाडले खिंडार!
karjat.jpg

अहमदनगर ः राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच कर्जत नगर पंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाला तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कर्जतमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. ही नगर पंचायत भाजपच्या ताब्यात आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार प्रयत्न करत आहेत. कर्जत तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आमदार पवार यांना नगर पंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. तर भाजपला आमदारकी गमावल्यावर किमान ही नगर पंचायत टिकविण्याचे आव्हान आहेत.

कर्जत नगरपंचायतची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नुकतेच कर्जतमध्ये येऊन गेले. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा केली होती. चंद्रकांत पाटील जाताच आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील भाजपच्या चाणक्य समजले जाणाऱ्या प्रकाश ढोकरीकरांसह चार जणांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीपूर्वी भाजपला कर्जतमध्ये मोठे खिंडार पडले आहे.

हेही वाचा...

आमदार रोहित पवार हे कर्जतचा सर्वांगीण विकास करू शकतात. त्यांनी केलेल्या कामाने आम्ही प्रभावित झालो आहोत. विकासाला साथ देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत, असे म्हणत या चौघांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीचा मार्ग धरला आहे. भाजपला अनेक निवडणुकांत कर्जतमध्ये विजय मिळवून देण्यात जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांचा मोठा वाटा राहिला होता. त्यांच्यासह नगरसेवक लालासाहेब शेळके, म.प. सोसायटीचे उपाध्यक्ष देविदास खरात व नगरसेविका पूत्र नितीन तोरडमल यांनी आज आमदार रोहित पवार यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवकचे शहराध्यक्ष प्रा. विशाल म्हेत्रे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील तनपुरे, उद्योजक संतोष नलवडे आदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कर्जतमधील ताकद वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या खासदार डॉ. सुजय विखे पाटील कर्जत तालुका दौऱ्यावर येत आहेत. ते या परिस्थितीत कोणती राजकीय खेळी करतात यावर कर्जतमध्ये राजकीय चर्चा रंगली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in