...तर आम्ही त्यांचे गाल आणि थोबाड रंगविल्या शिवाय गप्प बसणार नाही

विधान परिषदेतीलविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमधील महिलांच्या प्रवेशा बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
rupali chakankar.jpg
rupali chakankar.jpg

निघोज : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमधील महिलांच्या प्रवेशा बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या विधाना विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सांगलीत प्रवीण दरेकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

निघोज येथील आमदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी आमदार नीलेश लंके, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, माजी आमदार पोपटराव गावडे, कन्हैया उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, राजेश्री कोठावळे, दीपक सरडे, अशोक सावंत, प्रभाकर कवाद, ठकाराम लंके, सोमनाथ वरखडे, वसंत कवाद, बाळासाहेब लंके, सुदाम पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा...

दरेकरांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना चाकणकर यांनी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, तुमची दुकानदारी चालवत असताना तुम्ही आम्हाला नावे ठेवू नका. तुमचे घर चालविण्यासाठी आम्ही तेवढे सहकार्य ठेवतो मात्र तुम्ही जर राज्यातील महिलांचा अपमान करणार असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. तुम्ही तमाम महिलांची जाहीर माफी मागा. अन्यथा आम्ही तुमचे गाल आणि थोबाड रंगविल्या शिवाय गप्प बसणार नाही. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामान्य जनतेचा पक्ष आहे. वैचारिक विचाराचा वारसा घेऊन चालणारा आमचा पक्ष असुन सामान्य माणसाला आपलासा वाटणारा पक्ष आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही पक्ष नेटाने पुढे घेऊन चाललो असताना विरोधकांना हे आता पहावत नाही. 

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कधी पडेल याची वाट पहाणाऱ्या विरोधकांचा हिरमोड झाला आहे. त्याचे घर चालविण्यासाठी आम्ही मदत करतोच आहे. मात्र स्वतःला मूल होत नसल्याने दुसऱ्याचे बाळ पाळण्यात टाकणारे अनेक आहेत, अशी टीकाही चाकणकरांनी केली. 

हेही वाचा...

यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद व युवा नेते रमेश वरखडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच सोमनाथ वरखडे, बाळासाहेब लंके, सुदाम पवार यांचा तालुका समितीवर निवड झाल्याबद्दल चाकणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्तविक शांताराम कळसकर यांनी केले. सोमनाथ वरखडे यांनी आभार मानले. 

तर पुढचा गुलाल लाखाचा! पारनेर तालुक्यातील सामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळे आमदार नीलेश लंके हे विधानसभेला पासष्ट हजार मतांनी निवडून आले. मात्र सध्या त्यांनी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. आठवड्याला ते कोट्यवधी रुपयांची उद्घाटने करतात. त्यांनी विकासकामाचा सपाटा लावला असल्याने आमदार नीलेश लंके याचा पुढचा गुलाल लाखाचा असेल असे सांगून जनतेने त्यांना साथ द्या असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी पारनेरच्या जनतेला केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com