स्नेहलता कोल्हे यांनी पिचड कुटुंबीयांना भेटून दिली श्रद्धा व सबुरीची शाल
Snehalata kolhe.jpg

स्नेहलता कोल्हे यांनी पिचड कुटुंबीयांना भेटून दिली श्रद्धा व सबुरीची शाल

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आज पिचड कुटुंबीयांचीभेट घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी पिचड यांना श्रद्धा व सबुरी असे लिहिलेली साईबाबांची शाल भेट दिली.

अकोले : माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आज पिचड कुटुंबीयांची भेट घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी पिचड यांना श्रद्धा व सबुरी असे लिहिलेली साईबाबांची शाल भेट दिली. तसेच पिचडांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी दिलेली श्रद्धा व सबुरीची शाल व मिळविलेल्या आशीर्वादाची चर्चा नगर जिल्ह्यात होती. Snehalta Kolhe visits Pitched family to relive old memories

अकोले येथे महिला संघटन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी स्नेहलता कोल्हे आल्या असताना त्यांनी प्रथम माजी मंत्री मधुकर पिचड व हेमलता पिचड यांना भेटून शिर्डी येथील साईबाबांचा प्रसाद व श्रद्धा सबुरी या नावाची शाल भेट दिली. त्यांनी माजी मंत्री मधुकर पिचड व हेमलता पिचड यांच्या अंगावर शाल टाकून आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. साहेब तब्येतीची काळजी घ्या राजकारणातील व समाजकारणात आपले काम आजही दिशादर्शक असून ज्या क्रांतिवीर राघोजी भांगरे यांनी आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरुध्द भूमिका घेतली त्यांचे नाव भंडारदरा जलाशयाला आपण देता ते योग्यच आहे. त्यास आपला पाठिंबा आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग अकोले येथून जाणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही करीत असलेले काम दिशादर्शक आहे.

हेही वाचा...

उपस्थित कार्यकर्त्यांनी माजी मंत्री कोल्हे हे माजी मंत्री पिचड यांना जावई म्हणत असल्याची आठवण जागविली. हेमलता पिचड यांनी स्नेहलता कोल्हे यांचे औक्षण करून त्यांना शाल पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला राऊत, उप सभापती दत्ता देशमुख,संतोष बनसोडे, गोकुळ कानकाटे, शेखर वालझाडे, भास्कर एल्मामे आदी उपस्थित होते.

हेही वाचा...

विधानपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पाश्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरत आहे. पिचड व कोल्हे दोन्ही कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. भाजपमध्ये आल्यापासून पिचडांचे राज्याच्या राजकारणातील महत्त्व कमी होत चालल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकांत पिचडांची भुमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. पिचड यांच्या संपर्कात भाजपचे केंद्रीय नेतृत्व आहे. या दृष्टीने स्नेहलता कोल्हे यांच्या या राजकीय भेटीकडे पाहिले जात आहे.

Edited By - Amit Awari

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in