परिस्थिती कठीण, मात्र काँग्रेस पुन्हा उभारी घेईल...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र त्यांच्या स्वभावाला साजेशी संयमी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
balasaheb thorat.jpg
balasaheb thorat.jpg

संगमनेर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरूवारी (ता. 9) काँग्रेस संदर्भात एक वक्तव्य केले होते. यात ते म्हणाले होते की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीची तयारी सुरु असल्याच्या चर्चा मधल्या काळात सुरु होत्या. मात्र, भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसला डावलून चालणार नाही, असं राजकीय विश्लेषक सांगतात. अशावेळी आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाल्याचं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते.

या संदर्भात काँग्रेसकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र त्यांच्या स्वभावाला साजेशी संयमी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा...

बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेस ही राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांशी निगडीत विचारधारा आहे. राज्यघटनेचे मूलभूत प्रश्न हा आमचा विचार आहे. आज कदाचित त्या विचारधारेला कठीण परिस्थिती आली असेल, मात्र काँग्रेसपक्ष निश्चित पुन्हा उभारी घेईल.  

एक धर्मांध, जातीयवादाचा व्हायरस आज देशात घुसलेला दिसतोय, म्हणून आम्ही कठीण परिस्थितीत दिसत असू. मात्र एक दिवस काँग्रेस उभारी घेईल, आमची विचारधारा उभारी येईल त्याबाबत कोणीही शंका बाळगू नये, असे थोरात यांनी ठामपणे सांगितले. 

हेही वाचा...

शरद पवार यांनी आघाडी सरकारमध्ये सामिल असताना केलेले हे वक्तव्य योग्य आहे का याबाबत बोलताना ते म्हणाले, पवार यांनी ती मांडणी त्यांच्या पद्धतीने केली आहे. तरी विचारधारेवर आलेल्या व्हायरसमुळे काँग्रेस कमी दिसते आहे हे सगळ्यांनी ओळखले पाहिजे. 

लोकशाही व राज्यघटना टिकवण्यासाठी हा व्हायरस काढून टाकण्याची जबाबदारी केवळ काँग्रेसची नाही तर, प्रत्येक नागरिकाची आहे. नाना पटोले यांनी त्यांच्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली, त्याबाबत मी काही बोलू इच्छित नाही. ही विचारधारेची लढाई आहे. आपला देश कशा पद्धतीने चालवायचा तसेच लोकशाही व राज्यघटना जपण्याची आमची लढाई शेवटपर्यंत सुरू राहील. आम्ही हार मानणार नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in