सहकार विभागाची नगर तालुका बाजार समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस

बाजार समितीच्या संचालक मंडळाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा दावा नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.
सहकार विभागाची नगर तालुका बाजार समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस
nagar taluka krushi utpanna bazar samiti.jpg

नगर तालुका : नगर तालुक्यातील कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखालील संचालक मंडळाची सत्ता आहे. या संचालक मंडळाला महाविकास आघाडीचा त्यातही शिवसेनेचा जोरदार विरोध आहे. काल शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी पत्रकार परिषद घेत बाजार समितीच्या संचालक मंडळावर हल्लाबोल केला. या संचालक मंडळाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा दावा नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. हा अपहार मोठा असल्याचा दावा संदेश कार्ले यांनी केला.

यावेळी पत्रकार परिषदेत बाळासाहेब हराळ, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, गोविंद मोकाटे, उपसभापती दिलीप पवार, केशव बेरड, रामदास भोर, संदीप गुंड, गुलाब शिंदे, विठ्ठल काळे, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत उपस्थित होते.

हेही वाचा...

कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, त्यामध्ये बाजार समितीत दोष व अनियमितता आढळून आली. सहकार विभागाच्या चार अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालातही समितीला दोषी ठरविल्याने, त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. 


कार्ले म्हणाले, की ही नोटीस महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम 1963 च्या कलम 45 अन्वये दिली आहे. त्यामुळे 50 कोटींपेक्षा जास्त अपहार मार्केटमध्ये झाला आहे. आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सहकार विभागाकडे दाद मागत होतो, ‘कारणे दाखवा’ नोटीस देणे म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचार सिद्ध होणेच आहे. तो अपहार या समितीतील संचालक मंडळाने आणि सचिवाने केला. 

नोकर भरती बोगस केली, प्रॉव्हिडंट फंडची चलने खोटी दिली, सफाईचे टेंडर न काढताच बिले अदा करणे, तसेच व्यापाऱ्यांच्या वसुलीकरात तफावत असून, यासह अनेक कामांमध्ये अनियमितता आणि दोष आढळून आले आहेत, असा दावा कार्ले यांनी केला. 

हेही  वाचा...

हराळ म्हणाले, की या समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस एक झलक आहे. या समितीतील सर्व कारभाराचे शासनाने ऑडिट करणे गरजेचे आहे. तसे झाले तर हजारो कोटींचा गैरव्यवहार बाहेर येईल. हे संचालक मंडळ शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
गोविंद मोकाटे म्हणाले, की या समितीच्या सत्ताधाऱ्यांनी दूध संघाचे वाटोळे केले. आता बाजार समितीचे वाटोळे सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत सावध होणे आवश्यक आहे. बाजार समितीत येणाऱ्या उसाच्या टेम्पोकडूनही अनधिकृतपणे 500 रुपये वसुली केली जाते, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in