शिवसेनेच्या बडेंना मिळाले महापालिकेचे सभागृहनेते पद

या नवीन राजकीय समीकरणामुळे महापालिकेतील स्थायी समिती सभापती वगळता सर्व पदे बदलत आहेत.
amc.jpg
amc.jpg

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यांना काँग्रेसचे चार नगरसेवक व बसपचे चार नगरसेवकांचा पाठिंबा आहे. जून अखेरीचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौरांनी पदभार स्वीकारला. या नवीन राजकीय समीकरणामुळे महापालिकेतील स्थायी समिती सभापती वगळता सर्व पदे बदलत आहेत.

याचाच एक भाग म्हणून महापौरांनी आज महापालिकेत सभागृहनेतेपद जाहीर केले. अहमदनगर महापालिकेच्या सभागृह नेतेपदी नगरसेवक अशोक बडे यांची नियुक्ती करुन महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, श्याम नळकांडे, संग्राम कोतकर, दत्ता सप्रे, अमोल येवले, मदन आढाव, आकाश कातोरे, भालचंद्र भाकरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा...

महापौर शेंडगे म्हणाल्या, अहमदनगर महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असून, यात नगरसेवकांची भुमिका महत्वाची ठरत आहे. विविध विषयांवर मनपा सभामध्ये होणार्‍या चर्चेतून अनेक प्रश्न सुटत आहेत. यात सभागृहनेता म्हणून आपली भुमिका ही महत्वाची ठरणार आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर सर्वांच्या समन्वयातून आपण महानगरपालिकेची प्रतिमा उंचावताल, असा विश्वास व्यक्त केला.

निवडीनंतर सभागृहनेते अशोक बडे म्हणाले, महापौर रोहिणी शेंडगे व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने आपली या पदावर नियुक्ती झाली आहे. या पदाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याबरोबर महानगरपालिकेच्या कार्यात चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करु. पदाधिकारी व अधिकारी यांच्यात समन्वयातून नगरचा विकासास प्राधान्य देऊ, असे सांगून सर्वांचे आभार मानले.

हेही वाचा...

याप्रसंगी विलास शिरसाठ, बबन केतकर, दिलीप पेटकर, बाळासाहेब पाखरे, अ‍ॅड.पोपट बडे, बाळू भोर, भैय्या साठे, अण्णासाहेब फुंदे, मगर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com