पारनेरच्या पळवापळवीने शिवसेना अस्वस्थ 

नगर जिल्हयातील पारनेर नगरपालिकेतील नगरसेवकांची पळवापळवी हा आघाडी धर्माला तडा असल्याची तीव्र प्रतिक्रीया मातोश्रीवर उमटली असल्याचे समजते.
Shiv Sena is upset due to political developments in Parner
Shiv Sena is upset due to political developments in Parner

मुंबई : नगर जिल्हयातील पारनेर नगरपालिकेतील नगरसेवकांची पळवापळवी हा आघाडी धर्माला तडा असल्याची तीव्र प्रतिक्रीया मातोश्रीवर उमटली असल्याचे समजते. मात्र, हा स्थानिक राजकारणाचा भाग म्हणून सोडून द्यायचा की राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी नोंदवायची याबद्दल शिवसेनेत विचार सुरू आहे. 

पारनेरचे नगरसेवक थेट बारामतीत पोहोचल्याने स्थानिक शिवसेना नेते अनिल राठोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केवळ दोन दिवसांपूर्वी तासभर चर्चा करून गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबद्दल नाराजी कळवा, असे मातोश्रीवरून काही महत्वाच्या सहकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा स्थानिक प्रकार असून पक्ष वाढवायचा अधिकार प्रत्येकाला आहे, अशी भूमिका घेतली आहे. 

शिवसेना नेते, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्यावर नाराज झालेल्या तालुका प्रमुखाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे समर्थक त्या पक्षात गेले आहेत. त्यात फार वाढविण्यासारखे आहे तरी काय, असे शिवसेनेतील भाजपशी फटकून वागणाऱ्या नेत्यांचे मत आहे, तर आघाडीत असे कसे चालेल, असे काहींना वाटते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या प्रकारामुळे नाराज झाले आहेत, असे विश्वसनीयरित्या समजते. 


राष्ट्रवादीची ‘पावर' वाढली; शिवसेनेचे पाच नगरसेवक गळाला
 

पारनेर  : शिवसेनेच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख उमाताई बोरुडे यांच्यासह शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना पारनेर शहरात  मोठा  धक्का आहे. नगरसेवकांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत येथे प्रवेश केला. या वेळी आमदार निलेश लंके यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे उपस्थित होते.

आज सकाळीच आमदार लंके यांच्या समवेत शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख उमा बोरूडे,  नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने या नगरसेवकांनी थेट बारामती गाठली.  उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थीतीत या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या नगरसेवकाबरोबरच  उद्योजक सहदेव तराळ, शैलेश औटी, संतोष गंधाडे, राजेश चेडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
    
नगर पंचायतची निवडणूक आवघ्या चार महिण्यावर आली असताना शिवसेनेचे नगरसेवक फुटल्याने औटी यांना पारनेर शहरात शह देण्यात आमदार लंके य़शस्वी झाले आहेत. या प्रवेश प्रंसगी आमदार लंके, तालुका अध्यक्ष तरटे, नगरसेवक विजय वाघमारे, नगरसेवक पती दिनेश औटी, विलास सोबले, युवा नेते विजय औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, पिंपळगावचे सरपंच अशोक घुले, सुभाष औटी आदी उपस्थीत होते. 

गेली अनेक दिवस नगरसेवकामध्ये अस्वस्थता होती. या पूर्वी या नागरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ठरला होता, मात्र त्या वेळी त्यांना अचानक थांबविण्यात आले होते. आज मात्र लंके पाच नगरसेवकासह काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फोडण्यात यशस्वी झाले. इतकेच नव्हे, तर त्यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात हजर करत पक्षात प्रवेश मिळवून दिला.

शिवसेनेचे पाच नगरसेवक आणि काही कार्यकर्त गळाला लागल्याने आमदार लंके यांनी पारनेर शहराच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्शवभूमिवर हे मोठे यश समजले जाते. आता यापुढे औटी कुठली रणनिती आखतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर लंके शिवसेनेच्या आणखी कुणाला गळाला लावतात याची उत्सूकता पारनेरकरांना लागली आहे.

सध्या नगरपंचायतीची सत्ता औटी गटाकडे आहे. मध्यंतरी नगराध्यक्ष वर्षा नगरे यांच्यावरही अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या, मात्र त्या औटी यांच्या दबावतंत्रामुळे थंडावल्या गेल्या. आता नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अवघे चार महिने अवकाश असल्याने लंके पुढे काय चाल खेळतात व औटी कोणते डावपेच आखतात, याकडे शहरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com