नगरचे सौरभ बोरा झाले तिरुपती देवस्थानचे सदस्य

ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान दोन हजार वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
नगरचे सौरभ बोरा झाले तिरुपती देवस्थानचे सदस्य
saurabh bora.jpg

अहमदनगर : आंध्रप्रदेशातील तिरुमला तिरूपती देवस्थान हे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान समजले जाते. जगभरातील भाविक तेथे जाऊन बालाजीचे दर्शन घेतात. बालाजी ही हिंदू देवता विष्णूचा अवतार मानली जाते. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान दोन हजार वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. Saurabh Bora became a member of Tirupati Devasthan

आंध्रप्रदेश सरकारने नुकतीच तिरुमला तिरुपती देवस्थानच्या नूतन अध्यक्ष व 28 सदस्यांची घोषणा नुकतीच केली आहे. नूतन कार्यकारणीत नगरचे सुपुत्र व उद्योजक सौरभ बोरा यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. 

सौरभ बोरा हे तिरुपती बालाजी भगवंताचे नित्सिम भक्त आहेत. ते सध्या मुंबई येथे स्थायिक आहेत. विविध सामाजिक कामात सतत सहभागी असतात. त्यांची तिरुमला तिरुपती देवस्थानच्या सदस्य पदी निवड झाल्याची बातमी आज सकाळी नगर पोहचल्यावर त्यांच्यावर मित्रमंडळींत आनंदाचे वातावरण आहे. शहरात व सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात याबद्दल चर्चा होत आहे.

हेही वाचा...

या यादीमध्ये देशभरातून केवळ 24 व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली. नगर शहराला हा मान प्रथमच मिळाला आहे. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ लागलेली असते. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री या सदस्य निवडीसाठी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते. महाराष्ट्रातून सौरभ बोरा व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्ती मिळाली आहे. 

Edited By - Amit Awari

Related Stories

No stories found.