तनपुरेंसह संग्राम जगताप जयंत पाटलांना भेटले : नगरची पूररेषा वादाची ठरणार

नगर शहरातून जाणाऱ्या सीना नदीची पूरनियंत्रण रेषा नुकतीच जलसंपदा विभागाने जाहीर केली. त्यानुसार शहरातील सीना नदीकाठचा मोठा भाग पूरनियंत्रण रेषेत येत आहे. सीनानदी लगत राहणारेनागरिक व विशेषतः व्यापारी वर्गाच्या चिंता वाढल्या आहेत.
तनपुरेंसह संग्राम जगताप जयंत पाटलांना भेटले : नगरची पूररेषा वादाची ठरणार
Sangram Jagtap meets Jayant Patil

नगर ः नगर शहरातून जाणाऱ्या सीना नदीची पूरनियंत्रण रेषा नुकतीच जलसंपदा विभागाने जाहीर केली. त्यानुसार शहरातील सीना नदीकाठचा मोठा भाग पूरनियंत्रण रेषेत येत आहे. सीनानदी लगत राहणारे नागरिक व विशेषतः व्यापारी वर्गाच्या चिंता वाढल्या आहेत. या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी आज मुंबईत राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील व नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना मागणीचे निवेदन घेऊन चर्चा केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार उपस्थित होते. पूरनियंत्रणरेषाच बदलण्याचे निवेदन दिल्यामुळे सीनानदीची पूरनियंत्रणरेषा वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे.Sangram Jagtap meets Jayant Patil along with Tanpure: City's line will be controversial

निवेदनात म्हटले आहे की, नगर शहर हे ऐतिहासिक आहे. या शहराची स्थापना पाचशे वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपूर्वी झालेली आहे. तत्कालीन सत्ताधीश अहमदशहा यांनी नगर शहर सीना नदीच्या पूर्व तीरावर वसविले. आता या शहराची वाढ मूळ शहराच्या पश्चिम उत्तर व दक्षिण अशा तीन दिशांना झाली. या वाढीमुळे सीना नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. नगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीची लांबी तब्बल १४ किलोमीटर आहे. नगर शहराच्या मागील ५०० वर्षांचा इतिहास पाहिला तर शहरात सीना नदीच्या पुरामुळे शहरात मोठी जीवित अथवा वित्तहानी झाल्याची उदाहरणे नाहीत. याचे प्रमुख कारण असे आहे की, या नदीचा उगम शहराजवळच असून हा सर्व दुष्काळी भाग आहे. या नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसमान खूपच कमी आहे. त्यातच सुमारे १०० वर्षांपूर्वी या नदीवर पिंपळगाव माळवी येथे धरण बांधण्यात आले. त्यामुळे पुराचा धोका अजून कमी झाला आहे.

हेही वाचा...

असे असूनही नुकतेच सिंचन विभागाने या सीना नदीच्या पुररेषा आखून त्याप्रमाणे विकास अथवा बांधकाम परवानगी देण्याबाबत सूचित केले आहे. या नकाशांचे अवलोकन केले असता व त्याविषयी माहिती घेतली असता या प्रस्तावित पुररेषेमुळे शहरातील फार मोठा विकसित आणि विकसनशील भाग बाधित होत आहे. या पुररेषा आता शहराच्या विकास योजना नकाशावर दर्शवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर या बाधित क्षेत्रावर (विशेषतः निळ्या रेषेच्या आत) कोणताही विकास अथवा बांधकाम परवानगी मिळणार नाही, असे सांगण्यात आले. परंतु त्यापूर्वी सुमारे ३० हजारांपेक्षा जास्त घरांना महापालिकेची परवानगी आहे.

हेही वाचा...

आता त्या घरांनाही पुराचा धोका निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. हा नगरकरांवर फार मोठा अन्याय आहे. ही पूर नियंत्रण रेषा दोन्ही बाजूंनी मोठ्याप्रमाणात आतपर्यंत दर्शवल्याने नगर शहराचा फार मोठा भु-भाग बाधित आलेला आहे. त्याचा शहराच्या विकासावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यातच शहराच्या पूर्वेस असणाऱ्या केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाने त्यांच्या क्षेत्रालगत असलेल्या जमिनीवरील विकासावर अनेक निर्बंध लादलेले आहेत. तसेच शहरात काही भारतीय पुरातत्त्वविभागाने संरक्षित ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तूपासून ३०० मीटर हवाई अंतरावर बांधकाम करण्यास अनेक निर्बंध आहेत. त्यातच आता या नव्या फार मोठ्या क्षेत्रावर नवे निबंध येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील एकूणच विकासावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. तसेच अनेक शेतकरी व नागरिक या निर्णयामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. तरी नगर शहरातील सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेबाबत फेर सर्वेक्षण करून बदल करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शशिकांत चंगेडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आपत्ती व्यवस्थापनाचे नियम धाब्यावर बसवत महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरात पूरनियंत्रण रेषेतच बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून नदी व त्याचे ओढे नाल्यांचे नैसर्गिक पात्र खुले करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.

नगर शहरात दमदार पाऊस

नगर शहरात आज सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शहरातील काही घरे व बेसमेंडमधील दुकानांत पावसाच्या पाण्याने शिरकाव केला होता. नालेगाव परिसरात पूर आल्या सारखी स्थिती होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in