आरक्षण हा मराठा युवकांना खेळविण्याचा "गेम' : बी. जी. कोळसे पाटील - Reservation is a "game" for Maratha youth to play: BG Kolse Patil | Politics Marathi News - Sarkarnama

आरक्षण हा मराठा युवकांना खेळविण्याचा "गेम' : बी. जी. कोळसे पाटील

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 मे 2021

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक संकटे आली. परंतु ते डगमगले नाहीत. त्यांचा आदर्श घेऊन आपण प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजे.

नगर : आरक्षण हा मराठा युवकांना खेळविण्याचा "गेम' होता. मनुवाद्यांची व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस)  (RSS) ती चाल होती. देशाचे सार्वजनिक उद्योग भांडवलदारांना विकलेले आहेत, असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील (B.J.Kolshe Patil) यांनी व्यक्त केली. (Reservation is a "game" for Maratha youth to play: BG Kolse Patil)

आरक्षणातून फक्‍त शैक्षणिक लाभ होणार होता. गुणवत्तेच्या जोरावर मराठा तरुणांनी आपले अस्तित्व दाखवून द्यावे. आरक्षण रद्द झाल्यामुळे काहीही नुकसान झालेले नाही. आरक्षण देणारे आपणही होऊ शकतो. थोरल्या भावाची भूमिका निभवावी, असे ते म्हणाले.

कोळसे पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक संकटे आली. परंतु ते डगमगले नाहीत. त्यांचा आदर्श घेऊन आपण प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देताना मराठे विरुद्ध मराठेतर असे गाजर दाखविण्यात आले. ज्यांनी आरक्षण दिले त्यांनीच खऱ्या अर्थाने तुम्हाला फसविले आहे.

आरक्षणाबरोबरच इतरही अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कायदे हे विषारी मनुवादी आहेत. सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करून युवकांच्या हाती नोकऱ्याच ठेवलेल्या नाहीत. देश विकला गेला आहे. मनुवाद्यांची, आरएसएसची चाल ओळखा, असे आवाहनही कोळसे पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा...

कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारांवर 

नगर : जिल्ह्यात एकाच दिवशी 4475 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंतचा कोरोनाबाधितांच्या संख्येचा हा उच्चांक आहे. नगर शहरात सर्वाधिक 766 रुग्ण आढळून आले. त्याखालोखाल नगर तालुक्‍यात 468, तर संगमनेर तालुक्‍यात 386 रुग्ण आढळून आले. 

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत 1053, खासगी रुग्णालयांच्या प्रयोगशाळेत 2385, रॅपिड अँटिजेन चाचणीत 1037 रुग्ण आढळून आले. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 25 हजार 114 झाली आहे. 

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदे आदी तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढले आहेत. 

तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे ः नगर शहर 766, नगर तालुका 468, संगमनेर 386, श्रीगोंदे 300, पारनेर 286, श्रीरामपूर 283, राहाता 281, कर्जत 244, कोपरगाव 238, राहुरी 219, अकोले 204, नेवासे 156, शेवगाव 152, पाथर्डी 144, जामखेड 130. भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत 92, लष्करी रुग्णालयात 9, परजिल्ह्यांतील 106, तर परराज्यांतील 11 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या एक लाख 93 हजार 642 झाली आहे. आतापर्यंत 2173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

दिवसभरात 3103 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एक लाख 66 हजार 355 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.19 टक्के झाले आहे. 

 

हेही वाचा...

मराठा समाजाचा निर्णय आता राज्य पातळीवर व्हावा

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख