जनतेलाही प्रश्न पडेल यांना आशीर्वाद का द्यावा - बाळासाहेब थोरात

थोरात म्हणाले, "महाविकास आघाडीवर आरोप करण्यासाठी कोणतीही गोष्ट आज नाही. मुख्यमंत्र्यांनी कोरोना चांगल्या प्रकारे हाताळला धारावी पॅटर्न जगात प्रसिद्ध झाला आहे. आजही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. तरीही हे जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत."
जनतेलाही प्रश्न पडेल यांना आशीर्वाद का द्यावा - बाळासाहेब थोरात
balasaheb thorat 1.jpg

नगर ः "भारतीय जनता पक्षची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. खरेतर जनतेला सुद्धा प्रश्न पडेल यांना आशीर्वाद का द्यावा? आम्हाला सत्तेत येऊन दीड-पावणे दोन वर्षे झालेली आहेत. अनेक नैसर्गिक संकटे, कोरोना यात महाविकास आघाडीने जे काम केले त्यात महाविकास आघाडी देशातील सर्वोत्तम राज्य सरकारांपैकी एक मानली जात आहे. त्यात भाजपचे एकही सरकार नाही. आम्ही ज्या पद्धतीने कोरोना हाताळला त्यानुसार उत्तर प्रदेशात काय झाले होते हे पाहिले पाहिजे. पवित्र गंगेची काय अवस्था झाली. भाजपला जनतेचा आशीर्वाद मागण्याचा कोणताही अधिकार देशात नाही. महाराष्ट्रातही असण्याची शक्यता नाही," असा अंगुली निर्देश करत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांवरच पलटवार केला आहे. The public is in question. Why bless them - Balasaheb Thorat

थोरात म्हणाले, "महाविकास आघाडीवर आरोप करण्यासाठी कोणतीही गोष्ट आज नाही. मुख्यमंत्र्यांनी कोरोना चांगल्या प्रकारे हाताळला धारावी पॅटर्न जगात प्रसिद्ध झाला आहे. आजही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. तरीही हे जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. जनतेच्या हिताचा, आरोग्याचा, हे विचार करत आहेत का? एका बाजूला म्हणतात, गर्दी करा, दुसऱ्या बाजूला म्हणतात काळजी घ्या. यांना फक्त राजकारण करायचे आहे.. त्यांना राजकारणासाठी यात्रा काढायच्या आहेत. त्यांना जनतेची काळजी नाही हे यातून स्पष्ट होते आहे."

हेही वाचा...

दिवा स्वप्न पहात रहा

"महाविकास आघाडी आज जाईल, उद्या जाईल हे दिवा स्वप्न ते सुरवातीपासून पाहत आहेत. आज पावणे दोन वषेँ होत आली. पुन्हा येणारी निवडणूकही आम्ही एकत्रितपणे चांगल्या प्रकारे लढवू. त्यातून पुन्हा महाविकास आघाडी सत्तेत आलेली तुम्हाला दिसेल. त्यामुळे दिवस भरण्याचा विषय नाही. तुम्ही तुमचे स्वप्न पाहण्याचे काम करा. आम्ही जनतेसाठी काम करत राहू."

जनता काय म्हणते त्याला महत्त्व

"मुख्यमंत्र्यांवर व्यक्तिगत नाव घेऊन टिका करण्यात आली. राज्य सरकारवर टीका करण्यासाठी जागा नाही म्हणून व्यक्तीवर टीका करण्याचे काही कारण नाही. देशातील सर्वोत्तम चौथ्या क्रमांकाचे काम राज्यात झालेले असल्याचे देशातील जनता मान्य करत आहे, असे असताना ते काय बोलतात याला महत्त्व नाही." 

तुमचं मनही सांगेल...

"महाविकास आघाडीवर आरोप करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचा डीएनए विरोधी पक्षाचा आहे. असे असेल तर तुम्ही विरोधीपक्षाचे काम करतात. आम्ही सत्ताधारी आहोत. जनतेसाठी काम करत आहोत. सामान्य माणसासाठी काम करत आहोत. तुमचा डीएनए विरोधी पक्षाचा असल्यामुळे तुम्ही विरोध करण्याचे काम करत आहात, पण तुमचे आरोप वस्तुस्थितीशी निगडीत नाहीत. महाविकास आघाडीचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नावे ठेवत आहात. तुमच्या मनाशी जरी विचारले तरी ते म्हणेल महाविकास आघाडीचे काम चांगले चालले आहे."

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in