समाजकंटकांवर कारवाई करून देवरे कुटुंबीयांना संरक्षण द्या

निवेदनात म्हटले आहे, की पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या आपले शासकीय कर्तव्य बजावत असतांना त्यांना काही स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि खंडणीखोर समाज कंटकांनी मानसिक आणि शारिरीक वांरवार त्रास देण्याचा प्रयत्न चालूच ठेवला आहे.
समाजकंटकांवर कारवाई करून देवरे कुटुंबीयांना संरक्षण द्या
jyoti devare.jpg

अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा सातत्याने मानसिक छळ करुन त्रास देण्याऱ्या सामाजिक व राजकीय घटकांना वेळीच प्रतिबंध घालून संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच देवरे कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व महिला व बालकल्याण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. Protect Deore family by taking action against troublemakers

निवेदनात म्हटले आहे, की पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या आपले शासकीय कर्तव्य बजावत असतांना त्यांना काही स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि खंडणीखोर समाज कंटकांनी मानसिक आणि शारिरीक वांरवार त्रास देण्याचा प्रयत्न चालूच ठेवला आहे. कोविंड आपद्ग्रस्त स्थितीत प्रशासकीय कामकाज शिताफिने बजावत असताना अशा काही खंडणीखोर समाज कंटकाना खंडणी उकळतांना कायदेशीररित्या प्रतिबंध देखील करण्याचा धिरोदत्त प्रयत्न या महिला प्रशासकीय अधिकाऱ्याने केला आहे. राजकीय नेतृत्वाने आणि वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेने अशा परिस्थितीत अधिकाऱ्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहून त्यांचे मनोधर्य उंचावणे गरजेचे आहे. तथापि आजच ज्योती देवरे यांची प्रसारित झालेली ध्वनीफित महाराष्ट्रातील प्रशासनाला हादरवून सोडणारी आहे. 

हेही वाचा...

वन विभागातील प्रशासकीय अधिकारी स्वर्गीय दीपाली चव्हाण यांना ज्या मानसिक आणि प्रशासकीय छळाला कंटाळून आपले आयुष्य संपवावे लागले, काहीसा तसाच ज्योती देवरे यांचा हताश सुर त्यांच्या या ध्वनीफितीमधून प्रतीत होतो आहे. कोविडच्या भयावह संकटातून राज्यात स्थिरस्थावरता आणण्यासाठी कमालीच्या रिक्त जागासह राज्य प्रशासनावर प्रचंड असा दबाव आहे. परंतू प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मूलभूत अडचणीकडे राजकीय नेतृत्वाचे होत असलेले कमालीचे दुर्लक्ष आणि असहाय्यतेतून स्वर्गीय दीपाली चव्हाण, यांच्या सारख्या सक्षम महिला अधिका-यांच्या बाबतीत होत असलेल्या दुर्दैवी घटना, पुरोगामी महाराष्ट्राला शोभनीय नाहीत, ही बाब आम्ही खेदाने नमूद करीत आहोत.

महासंघाने संदर्भाधिन दि. २०-०९-२०२० रोजीच्या पत्राद्वारे ज्योती देवरे यांच्याशी गैरवर्तन करुन धमकावणाऱ्या समाजकंटकांविरोधात कठोर कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तातडीने सुरक्षा पुरविण्याबाबत देखील आग्रही विनंती केली होती. परंतु राजकीय नेतृत्वाने आणि वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेने ही बाब किती गांभियाने घेतली याबाबत ध्वनीफितीतील देवरे यांचा हताशपणा सर्वकाही सांगून जातो. त्यामुळे वेळीच या प्रकरणी आपण व्यक्तीशः लक्ष घालून ज्योती देवरे यांना दिलासा द्यावा आणि त्यायोगे मानसिक खच्चीकरणातून कोणतेही चुकीचे पाऊल उचलण्यापासुन त्यांना परावृत्त करावे, तसेच लोकप्रतिनिधीना देखील उचित मार्गदर्शन करावे, अशी आग्रही मागणी आम्ही करीत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in