मंत्री गडाखांना शेतकऱ्यानी दिली डाळिंब भेट

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख कार्यक्रमानिमित्त रस्त्याने जात असताना शिंगवेतुकाई(ता.नेवासे)येथील पाच एकर लालबुंद डाळिबाच्या बागेने त्यांना जणू हाक दिली.
मंत्री गडाखांना शेतकऱ्यानी दिली डाळिंब भेट
gadakh.jpg

सोनई : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे शनिवारी (ता. 28) गाठीभेटी व इतर कार्यक्रम निमित्त शिंगवेतुकाई भागात होते. कमी पाणी असतानाही प्रयोगशील शेतकरी बापुसाहेब पवार यांनी अतिशय कष्टातून पाच एकर डाळिंबाचे पीक बहरुन दाखविले आहे. पवार परिवाराने मंत्री गडाख व त्यांच्या समवेत आलेल्यांना पिशवीत लालबुंद डाळिंबाचा वानोळा देत ॠणानुबंध जपला. या भेटीची महाराष्ट्रभर चर्चा रंगली आहे.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख कार्यक्रमानिमित्त रस्त्याने  जात असताना शिंगवेतुकाई(ता.नेवासे)येथील पाच एकर लालबुंद डाळिबाच्या बागेने त्यांना जणू हाक दिली. सर्व लवाजमा थांबला. त्यांनी पायी जात थेट शेताच्या बांधावर जात बाग नजरेखालून घातली. उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

हेही वाचा...

बागेत आलेल्या जलसंधारण मंत्री गडाखांचे वरद व संभाजी पवार यांनी स्वागत केले. यावेळी माजी सरपंच योगेश होंडे, गंगाधर विधाटे, शिवाजी पुंड, श्रीकांत पवार व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. 

गडाख यांनी डाळिंब पिकाची जात, फळे धरण्याचा हंगाम, दिल्या जाणाऱ्या फवारण्या, वेळोवेळी केली जाणारी झाडांची छाटणी, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण आदी विषयी शेतकरी पवार यांच्याशी चर्चा केली. इतर शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. या भेटीचे शिंगवेतुकाई, राजेगाव, वांजोळी, मांडेगव्हाण येथील शेतक-यांनी स्वागत केले आहे. 

Edited By - Amit Awari

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in