महिला व बालकल्याण समितीसाठी महापालिकेतील राजकारण तापले

महिला व बालकल्याण समितीतील राजकीय पक्षांच्या सदस्य संख्येत बदल झाला आहे. भाजपच्या वाट्याला 4, शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5, काँग्रेस व बसपकडे प्रत्येकी एक जागा वाट्याला आली आहे.
Nagar Mahapalika1.jpg
Nagar Mahapalika1.jpg

अहमदनगर ः अहमदनगर महापालिकेत सत्ता बदल होऊन आता दीड महिना झाला आहे. भाजपकडे सत्ता असताना त्यांनी उपमहापौर, सभागृह नेता, महिला व बालकल्याण सभापतीपद स्वतःजवळ ठेवले होते. शिवसेनेचा महापौर होताच आता महापालिकेत प्रत्येक ठिकाणी सत्ता बदल होऊ लागला आहे. उपमहापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले. स्थायी समितीपद केव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे. महापौर रोहिणी शेंडगे यांनी सोमवारी (ता. 23) महापालिकेतील महिला व बालकल्याण समिती बरखास्त केली. महिला व बालकल्याण समिती सदस्य निवडीसाठी आज महापौरांनी विशेष सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढला. 

महापालिकेत बुधवारी (ता. 1 सप्टेंबर) दुपारी 1 वाजता होणारी विशेष सर्वसाधारण सभा ही कोरोना परिस्थिती लक्षात घेता ऑनलाईन घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या सभेत 16 सदस्य निवडले जाणार आहेत. सभेच्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप व बसप या पक्षांचे महापालिकेतील गटनेते त्यांच्याकडील नगरसेवकांच्या संख्येच्या प्रमाणात सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात महापौरांना सादर करतील. हा लिफाफा सभेत उघडला जाईल. त्यानुसार गटनेत्यांनी सुचविलेल्या नावांचे सदस्य महापौर जाहीर करतील. या सदस्य निवडीसाठी इच्छुकांकडून राजकीय वजन वापरले जात आहे.

हेही वाचा...

या निवडीनंतर नाशिक विभागीय आयुक्तांकडे महिला व बालकल्याण सभापती व उपसभापती निवडीचा प्रस्ताव महापौरांमार्फत पाठविला जाईल. त्यानुसार विभागीय आयुक्तांकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल.

महापालिकेतील शिवसेनेच्या सारिका भुतकर यांचे नगरसेवकपद रद्द ठरविल्याने पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेची जागा भाजपने मिळविली. त्यामुळे स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीतील राजकीय पक्षांच्या सदस्य संख्येत बदल झाला आहे. भाजपच्या वाट्याला 4, शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5, काँग्रेस व बसपकडे प्रत्येकी एक जागा वाट्याला आली आहे.

शिवसेना की काँग्रेस
महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी शिवसेनेच्या पुष्पा बोरूडे तर काँग्रेसच्या रूपाली वारे यांचे नाव चर्चेत आहे. पुष्पा बोरूडे या माजी उपमहापौर अनिल बोरूडे यांच्या पत्नी आहेत. तर रुपाली वारे या माजी नगरसेवक निखील वारे यांच्या पत्नी आहेत. पुष्पा बोरूडे या महापौर रोहिणी शेंडगे यांच्या निकटवर्तीय आहेत. शिवाय शिवसेनेची सदस्य संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेचे पारडे जड समजले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com