राष्ट्रवादी काँग्रेसने केली राजकीय कडी : शहरातील उड्डाणपुलाचे केले नामकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात सर्व राजकीय विरोधक एकत्र आल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
ncp nagar.jpg
ncp nagar.jpg

अहमदनगर : अहमदनगर शहरातील एमआयडीसीत असलेल्या आयटी पार्कमध्ये जाऊन काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आमदार संग्राम जगताप यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. किरण काळेंवर गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी शिवसेना व भाजप जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून आले. काँग्रेसला दिलेल्या शिवसेना व भाजपने दिलेल्या पाठिंब्यामुळे शहरात राजकीय चर्चांना उधान आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात सर्व राजकीय विरोधक एकत्र आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. भाजप व शिवसेनेकडून त्यांच्या दिवंगत नेत्यांचे नाव उड्डाणपुलाला देण्याची मागणी होती. अशा स्थित काल (मंगळवार) राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी जुन्या बस स्थानका जवळील शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सध्या तयार होत असलेल्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे नामकरण केले. त्यामुळे भाजप व शिवसेनेची राजकीय कोंडी झाली असल्याची चर्चा आज अहमदनगर शहरात आहे.

हेही वाचा...

यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान होत असलेल्या उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नगरकरांच्या वतीने उड्डाणपूलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. 

जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उड्डणपूलाच्या नामकरण फलकाचे अनावरण करुन नारळ फोडण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, नगरसेवक प्रकाश भागानगरे, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, शहराध्यक्ष वैभव ढाकणे, निलेश बांगरे, संतोष ढाकणे, भरत गारूडकर, राजेंद्र भालेराव, निलेश इंगळे, वैभव म्हस्के, शहानवाझ शेख, सुफियान शेख, वसिम शेख, मिजान कुरेशी, अजय गुंड पाटील, जाकिर शेख, हाफिज शेख, सागर गुंजाळ, शाहरुख शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत, नगरकरांच्या वतीने उड्डाणपूलाचे नामकरण करुन उड्डाणपूलाच्या खांबांना नामकरणाचे भिंतीपत्रके चिकटविण्यात आले. यापुर्वी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलच्या वतीने सदर उड्डाणपूलास शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी करुन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र प्रशासनाने सदर मागणीकडे दुर्लक्ष केल्याने उड्डाणपूलाचे जाहीर नामकरण करण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते म्हणाले की, उड्डाणपूलाला शिवाजी महाराजांचे नाव देण्याची संबंधित विभागाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला या विभागाने उत्तर न दिल्याने. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुलाचे नामकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवाजी महाराजांचा नांव उड्डाणपूलास देण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर त्याला विनाविलंब मंजूरी देण्याची गरज होती. मात्र नगरकरांच्या वतीने या उड्डाणपूलाचे नामकरण करण्यात आले असून, संबंधित खात्याने देखील हे नामकरण अधिकृत घोषित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com