मी जिल्हा बँकेत जेवढे 15 वर्षांत केले तेवढे कोणत्याही कारखानदाराने केले नाही

शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके व नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनीकर्डिलेंवर आरोप केले होते.
shivaji kardile.jpg
shivaji kardile.jpg

नगर तालुका : नगर तालुक्यातील कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखालील संचालक मंडळाची सत्ता आहे. या संचालक मंडळाला महाविकास आघाडीचा त्यातही शिवसेनेचा जोरदार विरोध आहे. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके व नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कर्डिलेंवर आरोप केले होते. या आरोपाला शिवाजी कर्डिले यांनी आज एका कार्यक्रमात प्रतिउत्तर दिले. No manufacturer has done as much as I did in 15 years at the District Bank

बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चिचोंडी पाटील परिसरातील नागरिकांनसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती संतोष मस्के, विष्णू खांदवे, मनोज कोकाटे, दत्तात्रेय सदाफुले, बाबासाहेब खर्से, सुनील पंडित, दिलीप भालसिंग, बन्सी कराळे, बबन शेळके, बबन आव्हाड, उद्धव कांबळे, बाबासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा...

कर्डिले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षांत जनतेच्या विकास कामातून देशाचे महत्व जगाला दाखवून दिले आहे. कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाची आरोग्यसेवा कोलमडली परंतु नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या काममुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्याचे काम झाले आहे. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी देशातील जनतेला मोफत लसीकरणाचा घेतलेला निर्णय क्रांतिकारी आहे. 

नगर तालुका महाविकास आघाडीचे लोक आमच्यावर आरोप करत आहेत. कारण त्यांना जिल्हा परिषदेतील त्यांचे कर्तृत्त्व झाकायचे आहे. जिल्हा परिषदेत ज्या चोऱ्या माऱ्या केल्या, टक्केवारी गोळा केली ती झाकण्यासाठी ते आरोप करत आहेत. आम्ही मनाचा मोठेपणा ठेवत बाजार समितीला कै. दादापाटील शेळके यांचे नाव दिले. याचे सुद्धा त्यांना दुःख झाले आहे.  

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांचे नाव न घेता कर्डिले म्हणाले, ते दादा पाटलांच्या मतावर निवडून आले. आम्ही कधी कारखान्यात राजकारण केले नाही. त्यांना मदतच केली. त्यांनी दूध संघ काढला. त्यातील चार कोटी पैकी तीन कोटी स्वतःच्या संस्थेला घेतले. तेच असे उलटे उद्योग करतात आणि आपले उद्योग झाकण्यासाठी असे आरोप करतात. ते एखाद्या शिपाया सारखे जिल्हा परिषद उघडायला जातात आणि बंद होईपर्यंत तिथेच असतात. त्यांना तिथे काही सापडत नाही. म्हणून ते बाजार समिती व जिल्हा बँकेत लक्ष घालतात.

हेही वाचा...

आम्ही भानुदार कोतकर व आमदार अरुण जगताप यांच्या सहकार्यातून नगर तालुका बाजार समितीला राज्यात सन्मानाने उभी करण्याचे काम केले.

आरोप करणारे कुठे तरी आंदोलन करून सहानुभूती मिळवू पाहत आहेत. ते काय करतात हे सर्व आम्हाला माहिती आहे. ते आम्ही सांगत बसत नाही. आम्ही केवळ कामाशी काम ठेवतो. लोकांना मदत करण्याचे काम करतो. त्यांचे कर्तृत्व बाहेर आले तर त्यांना तुरूंगात जावे लागेल.

जिल्हा बँकेत मी 15 वर्षांत जेवढे काम केले तेवढे आतापर्यंत कोणत्याही कारखानदाराने केले नाही. ते काम मी शेतकरी हीत डोळ्यासमोर ठेऊन केले. नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून जो लाभ देणे शक्य होईल तो दिला जाईल, असेही शिवाजी कर्डिले यांनी आश्वस्त केले.

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com