भंडारदरा जलपूजनावरून राष्ट्रवादीत फूट

भंडारदरा धरण भरले आहे. निळवंडे व मुळा ही धरणे भरत आली आहेत.
भंडारदरा जलपूजनावरून राष्ट्रवादीत फूट
ncp akole.jpg

अकोले : अहमदनगर जिल्ह्यात दर वर्षी 15 ऑगस्ट पर्यंत सर्व धरणे भरतात. मात्र यंदा पावसाने जिल्ह्यात उशिराने दमदार आगमण केले. त्यामुळे पिके, जनावरे, घरे, पूल यांची मोठी हाणी झाली असली तरी धरणे पूर्ण क्षमतेने भरू लागली आहेत. भंडारदरा धरण भरले आहे. निळवंडे व मुळा ही धरणे भरत आली आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून जलपूजन कार्यक्रम करण्यात येत आहेत. 

हेच जलपूजनाचे कार्यक्रम राजकीय पक्षांतील दुही दाखवित आहेत. असाच प्रकार भंडारदरा धरणातील जलपूजन कार्यक्रमात झाला. राष्ट्रवादीच्या दोन गटांकडून स्वतंत्रपणे जलपूजन करण्यात आले. हे जलपूजन जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

भंडारदरा जलाशयाजवळ १२ सप्टेबरला सकाळी साडेदहाला भरला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोलेतील ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी सपत्नीक जलाशयाचे जलपूजन केले तर काल (मंगळवारी) राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी जलपूजन केले. 

हेही वाचा...

उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेला भंडारदरा जलाशय यावर्षी उशिरा भरल्याने लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. मात्र आठ दिवसांत पाऊस जोरदार बरसला. त्यामुळे भंडारदरा सह निळवंडे जलाशय तुडुंब भरले. दरवर्षी जलाशय भरले की राजकीय नेते जलपूजन करत असतात. 

गत वर्षी पिंपळगाव खांड जलाशयाचे तीन वेळा जलपूजन झाले तर यावर्षी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने एक दिवसा आड दोनदा जलपूजन झाले. त्यामुळे लहामटे-भांगरे यांच्यात समन्वय अभाव की मतभेद याबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे. 

जेष्ठ नेते अशोक भांगरे यांनी धरणात विस्थापित झालेल्या शेतकरी, सुनीता भांगरे, अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पोखरकर, वकील अनिल अरोटे, शेंडी ग्रामपंचायत सरपंच दिलीप भांगरे, व्यापारी संघटनेचे पांडुरंग अवसरकर, व शेंडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत जलपूजन केले. 

हेही वाचा...

जलपूजन झाल्यानंतर सोशल मीडियावर फोटो प्रसिद्ध होताच आमदार किरण लहामटे यांच्या कार्यकर्त्यांनी जलपूजन मंगळवारी आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते होणार असे बॅनर टाकून निमंत्रण देण्यात आले. आज सकाळी जेष्ठ नेते सीताराम गायकर, तालुका अध्यक्ष भानुदास तिकाडे, संपत नाईकवाडी, प्रकाश मालुंजकर, गुलाब शेवाळे यांच्या उपस्थितीत जलपूजन कार्यक्रम झाला. अशोक भांगरे व दिलीप भांगरे या कार्यक्रमात अनुपस्थित होते. 

याबाबत तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी भांगरे यांना संपर्क केला होता ते नाशिकला आरोग्य तपासणीसाठी गेले असल्याचे ते म्हणाले, असे असले तरी चर्चा मात्र जोरात आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in