तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळासाठी खासदार विखे पाटील सहकारमंत्र्यांच्या भेटीला

तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत तीन जून रोजी संपली आहे. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळासाठी खासदार विखे पाटील सहकारमंत्र्यांच्या भेटीला
sujay vikhe.jpg

राहुरी : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षांची मुदतवाढ मिळावी. अशी मागणी कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली.  आज (बुधवारी) मुंबई येथे खासदार डॉ. विखे-पाटील यांनी सहकार मंत्री पाटील यांची भेट घेऊन, तसे निवेदन दिले. MP Vikhe Patil met the Co-operation Minister for the Board of Directors of Tanpure Factory

तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत तीन जून रोजी संपली आहे.  कोरोना विषाणूच्या महामारीमुळे राज्य सरकारने  सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.  त्यानंतर टप्प्याटप्प्याने सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.  तनपुरे साखर कारखान्याचा गाळप हंगाम तोंडावर आहे.  त्याची तयारी करण्यासाठी कारखान्याच्या मशिनरीची दोष दुरुस्ती, ऊस तोडणी ठेकेदारांना आगाऊ उचल देऊन त्यांचे करार व इतर खर्चासाठी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.  त्यासाठी कारखाना ताब्यात राहिला पाहिजे. अशी भूमिका खासदार डॉ. विखे-पाटील यांनी नुकतीच जाहीर केली. 

हेही वाचा...

कारखान्याची निवडणूक प्रक्रिया होऊन, कारखान्याची सत्ता पुन्हा ताब्यात आल्यानंतर आगामी गळीत हंगाम पूर्व तयारी नसल्याने सुरू करणे शक्य होणार नाही.  कारखाना बंद राहिला तर, असंतुलन आणखी वाढणार आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या कर्जाचा हप्ता थकणार आहे. ऊस वेळेत तुटण्यासाठी ऊस उत्पादक सभासदांची ससेहोलपट होणार आहे.  कामगार पुन्हा बेरोजगार होणार आहेत.  अशा परिस्थितीत कारखान्याचे अस्तित्व अबाधित राहण्यासाठी विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ देणे. एवढाच पर्याय आहे.

हेही वाचा...

त्यादृष्टीने, खासदार डॉ. सुजय विखे पाटील  यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. "कारखाना कार्यक्षेत्रात मुबलक ऊस आहे.  आगामी ऊस गाळप हंगाम निर्विघ्नपणे व यशस्वी पार पाडण्याची तयारी आहे. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ मिळावी. म्हणजे, कारखान्याला आगामी हंगामाच्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारी सुरू करता येईल. कारखाना, ऊस उत्पादक सभासद व कामगारांच्या हिताच्या दृष्टीने संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जावा." अशी मागणी केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in